• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup 2026: 2 युवा खेळाडूंचा अचानक भारतीय संघात समावेश, कोण आहेत ते?

January 28, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सराव सामन्यांचा थरार रंगणार आहे. या सराव सामन्यांसाठी दिल्लीच्या 2 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. प्रियांश आर्या आणि आयुष बडोनी या दोघांची इंडिया ए टीममध्ये निवड करण्यात आली आहे. सराव सामन्यांसाठी या दोघांना दिल्ली रणजी संघातून रिलीज करण्यात आलंय. तर आयुष दोसेजा याला दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)

Priyansh Arya Smat

इंडिया ए टीम टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेआधी 2 सराव सामने खेळणार आहे. इंडिया ए समोर 2 फेब्रुवारीला अमेरिकेचं आव्हान असणार आहे. तर इंडिया ए टीम आपला दुसरा सराव सामना हा 6 फेब्रुवारीला नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. आयुष बडोनी आणि प्रियांश आर्या हे दोघे या सराव सामन्यांत खेळणार आहेत. (Photo Credit : PTI)

Priyansh Arya PBKS IPL

प्रियांश आर्या याने आतापर्यंत 16 लिस्ट ए सामन्यांमध्ये 34.80 च्या सरासरीने 522 धावा केल्या आहेत. तसेच प्रियांशने 1 शतक आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)

Ayush Badoni Domestic Cricket

आयुष बडोनी याला लिस्ट ए क्रिकेटमध्ये 27 सामने खेळण्याचा अनुभव आहे. आयुषने लिस्ट ए कारकीर्दीत 36.4 च्या सरासरीने 693 धावा केल्या आहेत. आयुषने या दरम्यान 1 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)

Ayush Doseja Ranji Trophy

तर आता आयुष दोसेजा याला दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आयुषने रणजी ट्रॉफी स्पर्धेत यंदाच्या हंगामात 98.75 च्या सरासरीने 790 धावा केल्या आहेत. तसेच आयुषने या दरम्यान 3 शतकं आणि 5 अर्धशतकं लगावली आहेत. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुधचे होणार ट्रिपल गोचर! या 3 राशींना बंपर लाभ होणार, भरपूर कमाई करणार
  • Budget 2026 : औषधांच्या किंमतीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची मध्यमवर्गीयांना मोठी भेट
  • Budget 2026 : आता सिगारेट महागली, जाणून घ्या 10 रुपयांची सिगारेट किती रुपयांना मिळणार?
  • Video: एपस्टीनचे धक्कादायक कांड, नव्या व्हिडीओंनी खळबळ, चक्क बायकांच्या मागे लागून…
  • आता हे सहन करू शकत नाही, युवी तर…, युवराज सिंहच्या बायकोच्या विधानामुळे खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in