• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup 2026 : पाकिस्तानसोबत असताना फुटकं नशीब, पण टीम इंडिया जॉइंन करताच या माणसाचं नशीब पालटलं, थेट 3 ICC ट्रॉफी नावावर

March 13, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाने रविवारी तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये न्यूझीलंडवर 96 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयाचं पहिलं श्रेय हे खेळाडूंना जातं. पण त्याचसोबत या खेळाडूंवर मेहनत करणाऱ्या सपोर्ट स्टाफला सुद्धा विजयाचं श्रेय आहे. या सपोर्ट स्टाफमध्ये एक असा सदस्य आहे, जो आधी पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला प्रशिक्षण देत होता. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्याच्या नावावर कुठल्याही यशाची नोंद झाली नाही. पण टीम इंडिया जॉइंन करताच त्याचं नशीब पालटलं. वर्षभराच्या आत त्याच्या नावावर दोन आयसीसी ट्रॉफीज आहेत. हा सदस्य आहे दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि भारताचा गोलंदाजी कोच मोर्ने मोर्कल. टीम इंडियाचं गोलंदाजी कोच बनणं त्याच्या करिअरमधील एक मोठी उपलब्धी ठरली आहे.

टी20 वर्ल्ड कप 2024 संपल्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये मोर्ने मोर्कल टीम इंडियाचे गोलंदाजी कोच बनले. हेड कोच गौतम गंभीर यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केली होती. गौतम गंभीरला आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि SA 20 सुपर जायंट्समध्ये त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव होता. मोर्कल गोलंदाजी कोच बनल्यापासून टीम इंडियाने टेस्टमध्ये इतकी खास कामगिरी केली नसेल, पण मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करत तीन ट्रॉफीज जिंकल्या आहेत. मोर्कल यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने आधी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला. त्यानंतर 2025 मध्ये आशिया कप जिंकला आणि आता टी20 वर्ल्ड कप. टीम इंडिया जॉइंन करताच मोर्ने मोर्कल यांचे दिवस पालटले आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचं प्रदर्शन कसं होतं?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, आशिया कप 2025 आणि टी20 वर्ल्ड कप 2026. तीन वर्षापेक्षा कमी काळात गोलंदाजी कोच म्हणून मोर्ने मोर्कल यांनी हे यश कमावलय. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमने अजूनपर्यंत एकही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. पण मोर्कल यांच्या क्रिकेटिंग करिअरमधील ही मोठी उपलब्धी आहे. भविष्यात त्यांना याचा फायदा होईल. भारताला कोचिंग देण्याआधी ते पाकिस्तानचे सुद्धा कोच होते. सहामहिन्यापेक्षा कमी काळासाठी त्यांनी पाकिस्तान टीमला कोचिंग दिलं.

जून 2023 मध्ये 6 महिन्यासाठी त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गोलंदाजी कोच म्हणून नियुक्त केलं होतं. 6 महिने काय, 6 आठवड्यातच त्यांनी राजीनामा दिलेला. मोर्कल पाकिस्तानी टीमचे गोलंदाजी कोच असताना पाकिस्तान टीम 2023 चा आशिया कप खेळली. पण पाकिस्तानी टीम फायनलमध्ये प्रवेश करु शकली नाही.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू
  • Pakistan-Saudi Arabia : इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक, फायटर जेट्स सौदी अरेबियात दाखल
  • आशा भोसले यांच्या निधनावर पाकिस्तानी सेलिब्रिटी हळहळले, पोस्ट करत म्हणाले…
  • अरेरे किती ते हाल! अशोक खरातच्या घशा खाली घास उतरेना, बायकोबद्दल विचारताच…
  • Asha Bhosle Movie: गायिकाच नव्हे अभिनेत्रीही, 79 व्या वर्षी केलं डेब्यू; आशा भोसलेंचा हा चित्रपट पाहिलाय का ? डोळ्यांत येईल पाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in