• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup 2026 तीन दिवसांवर आलाय तरी टीम इंडियाकडे 3 प्रश्नांची उत्तरं नाहीत, कसं जिंकणार?

February 4, 2026 by admin Leave a Comment

टी 20 वर्ल्ड कप तोंडावर आलाय. पुढच्या तीन दिवसात क्रिकेट वर्ल्ड कप सुरु होतोय. नुकताच टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत दमदार विजय मिळवला. 4-1 ने ही मालिका जिंकली. ही सीरीज म्हणजे टीम इंडियासाठी वर्ल्ड कप आधीची रंगीत तालिम होती. या मालिकेमुळे हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांना काही प्रयोग करता आले. पण वर्ल्ड कप सुरु झाल्यानंतर असे कुठलेही प्रयोग करण्याची फार संधी नसेल. खासकरुन नॉकआऊटच्या मॅचमध्ये असे कोणतेही प्रयोग करता येणार नाहीत. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपचे गतविजेते आहेत. 2024 साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवलं होतं. टीम इंडियासमोर विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान आहे. टी 20 वर्ल्ड कप जवळ आलाय, तरी अजून काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

यंदाचा टी 20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंकेमध्ये होतोय. त्यामुळे खेळपट्टी, वातावरण काही गोष्टी अनुकूल आहेत. भारतात नेहमी फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या असतात. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाजीवर जास्त भर असेल. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपसाठी चांगली तयारी केलीय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळणं अजून बाकी आहे.

1) न्यूझीलंड विरुद्धची टी 20 सीरीज ही चाचपणी करण्याची शेवटची संधी होती. अभिषेक शर्माची ओपनिंगची जागा फिक्स आहे. पावरप्लेमध्ये टीम इंडियाला अशाच फलंदाजाची गरज आहे. त्याबद्दल एकदम स्पष्टता आहे. पण दुसऱ्या ओपनिंगच्या जागेसाठी कोण?. शुबमन गिलच्या जागी संजू सॅमसनची टीममध्ये निवड केली. पण संजू ओपनिंगच्या पोजिशनला न्याय देऊ शकलेला नाही. इशान किशनने न्यूझीलंड विरूद्धच्या सीरीजमध्ये दोन सामन्यात दमदार कामगिरी केली. शेवटच्या सामन्यात त्याने सेंच्युरी मारली. त्यामुळे दोघांपैकी प्लेइंग इलेव्हमध्ये कोणाला संधी मिळणार? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित आहे.

2) टी 20 सीरीजच्या पावरप्लेमध्ये तुम्हाला विकेट मिळाला नाही तर मग प्रतिस्पर्धी टीमच्या धावा तुम्हाला रोखता येत नाहीत. चौकार-षटकारांचा पाऊस सुरु होतो. एक खराब ओव्हर तुम्हाला टुर्नामेंटमधून बाहेर करण्यासाठी पुरेशी ठरते.
अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह तुमचे स्ट्राइक बॉलर आहेत. पण दोघांच्या गोलंदाजीवर न्यूझीलंड विरूद्धच्या सीरीजमध्ये मोठ्या प्रमाणात धावा लुटल्या गेल्या. खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असेल आणि बाऊंड्री जवळ असेल तेव्हा तिसरा वेगवान गोलंदाज कोण? हार्दिक/दुबेचा वापर तुम्ही कसा करणार आहात? त्यांना पूर्ण चार ओव्हर गोलंदाजी देणार आहात का?

3) न्यूझीलंड विरूद्धच्या सीरीजमध्ये विशाखापट्टणमची मॅच महत्वाची होती. कारण भारताने हा सामना गमावला. धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव कोसळला. धावा बनवताना लय बनवून ठेवणं महत्वाचं आहे. पहिले तीन फलंदाज धावा बनवतात तेव्हा खालची फळी त्यावर कळस चढवण्याचं काम करते. टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर मधल्या फळीवर दबाव येतो. विशाखापट्टणमच्या सामन्यात हेच दिसून आलं. न्यूझीलंडच्या 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 165 धावांवर आटोपलेला.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी, कुटुंबिय झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव
  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in