• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup 2026: टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये फक्त 10 हजार रूपयांसाठी सामना! नेमकं कारण काय?

March 8, 2026 by admin Leave a Comment

Team India: बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे यात काही शंका नाही. त्यामुळे क्रिकेटपटूंची कमाई देखील कोट्यवधींच्या घरात आहे. एका जाहिरातून क्रिकेटपटू कोट्यवधींची कमाई करतात. तसेच प्रत्येक सामन्यासाठी लाखो रूपये मिळतात. असं असताना क्रिकेटपटू 10 हजार रूपयासाठी सामना करतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरं आहे. याबाबत सीनियर स्पोर्ट्स जर्नलिस्ट विमल कुमार यांनी सांगितलं आहे. त्यांनी टीम इंडिया्चाय क्षेत्ररक्षण आणि फिल्डिंग कोचशी चर्चा करताना 10 हजार रूपयाबाबत माहिती काढली. सीनियर स्पोर्ट्स जर्नलिस्ट विमल कुमार यांच्या मते, टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप 10 हजार रुपये देऊन भारतीय खेळाडूंना चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी प्रेरणा देतात. टिम इंडियाचे खेळाडू कोट्यवधी कमवतात. त्यांच्यासाठी 10 किंवा 20 हजार रुपयांनी काही फरक पडत नाही. पण हे पैसे मिळवण्यासाठी संघ सरावात जीवाची बाजी लावतात.

विमल कुमार यांच्या मते, टीम इंडियाच्या खेळाडूंचं लक्ष्य 10 हजार रूपयांचं बक्षीस नाही तर चांगली क्षेत्ररक्षण करण्यावर असतं. त्यामुळे 10 हजार रुपयात टी दिलीप खेळाडूंकडून चांगलं क्षेत्ररक्षण करून घेतात असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप पैसे एका बंद लिफाप्यात आपल्या पगारातून देतात. विमल कुमार यांच्या मते, असा पैशांचा लिफाफा टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इशान किशनला मिळाला आहे. भारताचा अंतिम फेरीचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडचा संघ कायम डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी केली तर न्यूझीलंडला अडचणीत आणू शकतात.

It’s a sweet story that how Indian fielding coach T. Dilip reward players to encourage them to do good in fielding.

Vimal Kumar said T. Dilip gives 20k, inr to every player whoever takes the best catch in the match. pic.twitter.com/ftcqxkmHo6

— Harpreet Singh (@lubana_honey06) March 7, 2026

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघाने क्षेत्ररक्षणात फार काही चांगली कामगिरी केली असं नाही. उपांत्य फेरीचा सामना सोडला तर इतर सामन्यात क्षेत्ररक्षण सुमार राहिलं आहे. या स्पर्धेत सर्वाधिक झेल सोडणारा संघ म्हणून ठपका बसला आहे. आता अंतिमफेरीत अशी चूक करून चालणार नाही. भारताने अंतिम फेरीत अशी चूक केली तर महागात पडू शकतो. त्यामुळे भारताला या सामन्यात जीवाची बाजी लावून कामगिरी करावी लागणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in