• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup : काही फरक पडत नाही, कोणी हारलं काय आणि जिंकलं काय? अंपायर कमावतात बक्कळ पैसा; आकडा ऐकून…

February 5, 2026 by admin Leave a Comment


भारतात क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही तर एक आवड आहे, क्रिकेट म्हटलं जोश संचारतो.म्हणूनच क्रिकेटचे करोडो चाहते आहेत. मॅच पाहण्यासोबतच कित्येक लोकांना सामना खेळायलाही आवडते. काही लोक असे आहेत ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे पण क्रिकेटमध्ये करिअर करणे म्हणजे फक्त खेळाडू बनणं इतकंच नसतं. जर तुम्हाला क्रिकेटचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही अंपायर (पंच) देखील बनू शकता. जर तुम्हाला क्रिकेटचे चांगले ज्ञान असेल. तुम्हाला क्रिकेटचे सर्व नियम चांगले माहित असतील, तर तुम्ही पंचगिरी देखील करू शकता. बीसीसीआय आणि आयसीसी सारख्या मोठ्या मंडळांचे अंपायर बनून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

अंपायर बनण्यासाठी पात्रता काय ?
क्रिकेट सामन्यातील किंवा अंपायर बनण्यासाठी, प्रथम क्रिकेटशी संबंधित सर्व नियमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासोबतच निर्णय घेण्याची क्षमता, बोलण्याचे कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्ती देखील खूप महत्त्वाची असते. एवढंच नव्हे तर तुम्हाला राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्यत्व घ्यावं लागतं. राज्य क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या सामन्यांमध्ये तुम्हाला पंचगिरी सुरू करावी लागेल. त्यानंतर, संघटना तुम्हाला अधिकृत करते.

राज्य पातळीवर अंपायर म्हणून 3 वर्षांच्या अनुभवानंतर, बीसीसीआय लेव्हल 1 परीक्षेसाठी अर्ज करता येतो. पंच होण्यासाठी, तुम्हाला लेव्हल-1 परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हा पेपर दरवर्षी बीसीसीआय आयोजित करते. पेपरपूर्वी कोचिंग क्लास असतो. परीक्षेनंतर, उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाते.

ज्या उमेदवाराची निवड होते त्यानंतर त्याला एक इंडक्शन कोर्स दिला जातो. ज्यामध्ये त्याला अंपायरिंगबद्दल सांगितले जाते. त्यानंतर, मुलाखत आयोजित केली जाते. जो या मुलाखतीत किंवा इंटरव्ह्यूमध्ये पास होतो,त्याला लेव्हल-2 परीक्षेत समाविष्ट केले जाते. पुढे वैद्यकीय चाचणीनंतर त्याला बीसीसीआय पंच किंवा अंपायर बनवलं जातं. कोणत्याही संघाचा विजय किंवा पराभव पंचांच्या निर्णयावरच ठरवला जातो.

अंपायरिगंच प्रशिक्षण कुठे होतं ?

भारतात अंपायरिगंच प्रशिक्षण बेंगळुरू येथील पंच अकादमीमध्ये होते.

अंपायरला पगार किती असतो ?

जर अंपायरच्या पगाराबद्दल बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचांचे पगार खूप जास्त असतात. आयसीसी सामन्यासाठी अंपायरची फी 2 ते 3 लाखांपर्यंत असते. जर आपण देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोललो तर प्रत्येक सामन्यासाठी शुल्क हे 40 ते 50 हजारांदरम्यान असते.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in