• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup आधी भारताच्या खेळाडूची कसोटी, 2 सामने खेळणार, कुणाविरुद्ध? जाणून घ्या

February 1, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या मालिकेत धमाका केला. भारताने न्यूझीलंडचा 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 4-1 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. भारताला या दणदणीत विजयानंतर गूड न्यूज मिळाली आहे. भारताचा मॅचविनर खेळाडू फिट झाला आहे. (Photo: PTI)

Tilak Varma Team India

टीम इंडियाचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज तिलक वर्मा फिट झाला आहे. तिलकला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मुकावं लागलं होतं. मात्र आता तिलकने दुखापतीवर मात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेन्सकडून तिलक पूर्णपणे फिट असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. (Photo: PTI)

Team India Tilak Varma

तिलकला दुखापतीमुळे एक महिना क्रिकेटपासून दूर रहावं लागलं. तिलकने अखेरचा सामना हा रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळला होता. मात्र तिलकवर दुखापतीनंतर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तिलक बंगळुरुत रिहॅब करत होता. (Photo: PTI)

Tilak Varma Indian Cricket Team

तिलक वर्मा याची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तिलक या स्पर्धेआधी 2 सराव सामने खेळणार आहे. भारताच्या मुख्य संघातील खेळाडू विश्रांतीवर असताना तिलकसाठी कमबॅक म्हणून हे 2 सामने निर्णायक असणार आहेत. भारतीय संघातील इतर खेळाडू 1 तर तिलक 2 सामने खेळणार आहे. (Photo: PTI)

Tilak Varma Injury Recovery

वर्ल्ड कप स्पर्धेआधी होणाऱ्या सराव सामन्यात इंडिया ए टीम 2 फेब्रुवारीला यूएसए विरुद्ध भिडणार आहे. तर त्यांनतर 4 फेब्रुवारीला इंडिया एसमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. तिलकसाठी हे सामने फॉर्म आणि फिटनेसच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. (Photo: PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! बाग्लादेशमध्ये भूकंप, भारतानं दिला जोरदार धक्का, अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला
  • संध्याकाळी घरात दिवा लावताना कधीच करू नका या चुका, अन्यथा संपूर्ण कुटुंब येईल संकटात!
  • गोळीबार लाइव्ह दाखवला? रोहित शेट्टी प्रकरणात धक्कादायक खुलासा, बॉलिवूड हादरले
  • भारत पाकिस्तान सामन्यात मोबाईलचा वापर! सरफराज अहमदकडून नियमांचं उल्लंघन, आयसीसी देणार शिक्षा?
  • घडामोडींना वेग! भाजपच्या सर्व आमदारांची दिल्लीत बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in