• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup: अभिषेक शर्माने अंतिम फेरीत धावा करण्यासाठी वापरला असा टोटका, उधार घेतलं नशिब!

March 9, 2026 by admin Leave a Comment


टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा शेवट अखेर गोड झाला आहे. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत केलं नाही जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट चांगलीच चालली. त्यामुळे भारताला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. खरं तर या संपूर्ण स्पर्धेत अभिषेक शर्माची कामगिरी हवी झाली नव्हती. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुरूवातीच्या तीन सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. दक्षिण अफ्रिकेविरूद्धही फक्त 15 धावाचं खेळी केली. झिम्बाब्वेविरूद्ध 55 धावा केल्या, पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा रूळावरून गाडी घसरली आणि 10 धावांवर बाद झाला. उपांत्य फेरीत इंग्लंडविरूद्ध अभिषेक शर्मा 9 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे अंतिम फेरीत त्याला संघात जागा देऊ नका अशी ओरड होऊ लागली. पण कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याच्यावर विश्वास टाकला. अखेर अंतिम फेरीत त्याची बॅट तळपली.

अभिषेक शर्माने 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 247.62 चा होता. खरं तर या स्पर्धेत अभिषेक शर्माचा मनोबल ढासळलं होतं. सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्याने संघातील स्थान डळमळीत झालं होतं. पण इतर खेळाडू त्याला आत्मविश्वास देत होते. अंतिम सामन्यातील विजयानंतर अभिषेक शर्माने एक मोठा खुलासा केला आहे. अभिषेक शर्माने सांगितलं की अंतिम फेरीत दुसऱ्याच्या बॅटने फलंदाजी केली. म्हणजेच दुसऱ्या खेळाडूकडून बॅट उधार घेऊन फलंदाजी केली होती. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शिवम दुबे होता. शिवम दुबेच्या बॅटने त्याने अंतिम फेरीत फटकेबाजी केली.

अभिषेक शर्माने सांगितलं की, ‘आज मी शिवम दुबेच्या बॅटने फलंदाजी केली. सकाळी मला वाटलं की काहीतरी वेगळं केलं पाहीजे. गिल सोबत नव्हता म्हणून मी दुबेकडे गेलो आणि त्याची बॅट घेतली. धन्यवाद दुबे.’ अभिषेक शर्मा जेव्हा वाईट काळ सुरू असतो तेव्हा कोणाकडून काही ना काही घेतो. याच स्पर्धेत अभिषेक शर्मा मोहम्मद सिराजची जर्सी परिधान करून उतरला होता. पण त्यावेळी लक काही चाललं नाही. अंतिम सामन्यात दुबेची बॅट लाभली असं म्हणायला हरकत नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in