• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 WC 2026: पहिल्या सामन्यासाठी दिग्गज क्रिकेटपटूने जाहीर केली प्लेइंग 11, तिलक वर्मा आत; सॅमसन बाहेर

February 2, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यापासून भारतीय संघ स्पर्धेला सुरूवात करणार आहे. या स्पर्धेपूर्वी तिलक वर्माची संघात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे तिलक वर्मा प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. सराव सामन्यात तिलक वर्माने त्याची झलकही दाखवली आहे. त्यामुळे त्याचं प्लेइंग 11 मधील स्थान पक्कं झालं आहे. अमेरिकेविरुद्ध भारत ए संघाचा सराव सामना पार पडला. या सामन्यात तिलक वर्माने 24 चेंडूत 38 धावांची खेळी केली. त्यामुळे प्लेइंग 11 मधून एकाचा कोणाचा तरी पत्ता कापला जाणार हे निश्चित आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने या स्पर्धेतील अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग 11 निवडली आहे.

पार्थिव पटेलच्या टी20 वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यासाठी मते, प्लेइंग 11 मध्ये तिलक वर्माला स्थान मिळू शकते. तर संजू सॅमसन फॉर्मात नसल्याने त्याला बेंचवर बसावं लागू शकतं. पार्थिव पटेलने विकेटकीपर फलंदाज म्हणून फॉर्मात असलेल्या इशान किशनला संधी आहे. संजू सॅमसनची न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. त्याला पाचही सामन्यात संधी दिली गेली. मात्र फार काही करू शकला नाही. त्याने पाच डावात फक्त 46 धावा केल्या. या उलट इशान किशनने 4 डावात 215 धावा केल्या. यावेळी त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं. त्यामुळे त्याचा फॉर्म पाहता इशान किशनला बाहेर बसवणं, हा निर्णय घेणं कर्णधार आणि प्रशिक्षकला परवडणारा नाही. तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

Who makes the cut in @parthiv9‘s playing XI for India’s opening match? 🤔

Just 5 days to go until #TeamIndia’s mission to repeat & defeat history begins! 🤩👇

ICC Men’s #T20WorldCup 2026 👉 #INDvUSA | SAT, FEB 7, 6 PM pic.twitter.com/165p6EaE1g

— Star Sports (@StarSportsIndia) February 2, 2026

पार्थिव पटेलच्या मते, अभिषेक शर्मा आणि इशान किशन ओपनिंग करतील. तर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा येईल. चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादवला संधी दिली आहे. तर मधल्या फळीत अष्टपैलू हार्दिक पांड्यावर विश्वास टाकला आहे. सहाव्या क्रमांकावर फिनिशरच्या भूमिकेत असलेल्या रिंकु सिंहचं नाव सूचवलं आहे. तर अष्टपैलू शिवम दुबे आणि अक्षर पटेल सातव्या-आठव्या क्रमांकावर खेळतील. गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्तीच्या खांद्यावर असेल.

पार्थिव पटेलने निवडलेली प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकु सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • India vs Pakistan: तरच टीम इंडिया विरुद्ध खेळणार! पाकिस्तानची अट काय? जाणून घ्या
  • WPL 2026 Eliminator : दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, यूपी रोखणार?
  • शाहरुख खान – गौरी यांच्या लग्नात नीलम कोठारीने बजावली महत्त्वाची भूमिका, अनेक वर्षांचं सत्य समोर
  • Chanakya Niti : या पाच ठिकाणी शांत बसणंच हिताचं, अन्यथा मृत्यूशी पडू शकते गाठ
  • सर्वात मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवले, आता फक्त ‘इतका’ कर लागणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in