• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 WC 2026 : पहिल्याच सामन्यात बाबर-शाहीनने पकडलेला झेल वादाच्या भोवऱ्यात, झालं असं की.. Video

February 7, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पाकिस्तान नेदरलँड सामना चर्चेत राहिला. कारण नेदरलँडविरूद्धचा विजय पाकिस्तानला काही सहज मिळाला नाही. यासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. 19 व्या षटकात फहीमने 24 धावा ठोकल्याने विजयाचा मार्ग सुकर झाला. पण या सामन्यातील नेदरलँडच्या डावात एक झेल पकडला गेला. हा झेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदु ठरला आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण आयसीसीने जून 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिले झेलबाबत एक नियम जाहीर केला होता. तेव्हापासून रिले झेल घेताना काळजी घ्यावी लागत आहे. पण हा नियम पाकिस्तानला लागू होत नाही का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पाकिस्तानकडून पाचवं षटक टाकण्यासाठी मोहम्मद नवाज आला होता. त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मायकल लेविटने उत्तुंग फटका मारला. पण बाबर आझम लाँग ऑफवरून धावत आला आणि त्याने झेल पकडला. पण त्याचा समतोल बिघडल्याने सीमेपार जायच्या आत त्याने शाहीन शाह आफ्रिदीकडे चेंडू फेकला. शाहीन आफ्रिदीने झेल पकडला आणि मायकल लेविट बाद झाला. पण शाहीनने जेव्हा झेल पकडला तेव्हा बाबर आझम सीमेपार होता. त्यामुळे लेविटला बाद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

A solid relay catch!

Babar Azam & Shaheen Afridi produce a great relay catch at the boundary!

ICC Men’s #T20WorldCup | #PAKvNED | LIVE NOW 👉 https://t.co/GKcXaJHm9F pic.twitter.com/Anou9KM88n

— Star Sports (@StarSportsIndia) February 7, 2026

आयसीसी रिले कॅच नियम 19.5.2 नुसार, रिले कॅच घेताना सीमारेषा ओलांडणाऱ्या क्षेत्ररक्षकाने त्याच्या सहकाऱ्याला चेंडू पास केल्यानंतर लगेचच मैदानात परत यावं लागतं. अन्यथा त्याला नाबाद दिलं जातं. असं यापूर्वी टीम इंडियासोबत घडलं आहे. रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया ए संघाकडून नेहल वढेराने सदाकतचा झेल पकडताना बाहेर गेला. पण त्यापूर्वी त्याने चेंडू नमन धीरकडे पास केला होता. पण वढेरा सीमेपार असल्याने सदाकतला नाबाद दिलं. तेव्हा वाद झाला होता. पण पंचांनी हा नियम ठामपणे मांडला होता.

It was all happening in Qatar 👀 And things got pretty heated in the middle…

Watch India A take on Pakistan A in #AsiaCupRisingStars2025 – LIVE NOW on #SonyLIV and #SonySportsNetwork TV channels 📺 pic.twitter.com/OZ56KQYxf0

— Sony LIV (@SonyLIV) November 16, 2025

आता बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीने असाच झेल पकडला. पण पंचांनी यावेळी नियमाकडे कानाडोळा केला. यामुळे या नियमावरून क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. भारतासाठी वेगळा नियम आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवल्यास ‘या’ शाकाहारी पदार्थांचे करा सेवन
  • भावाने विष दिलं अन् किडणी निकामी झाली! प्रसिद्ध अभिनेत्याची गंभीर अवस्था
  • कोरियन ग्लो मिळवण्यासाठी नेमकं काय करावे?
  • सरकारचा मोठा निर्णय, गर्ल्स हॉस्टेल आणि लॉजसाठी नवे नियम लागू, नियम मोडल्यास होणार कारवाई
  • स्मृती मंधानाच्या आईने पलाश मुच्छलबाबत केलेली पोस्ट चर्चेत! मग करावी लागली डिलीट?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in