• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 WC: पहिल्या सामन्यात पाकिस्तानसोबत असं घडलं, शाहीनची धुलाई आणि तिसऱ्या षटकात बदलला चेंडू

February 7, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानची नाटकं सुरू झाली होती. आता वर्ल्डकप स्पर्धा सुरू झाली आहे आणि पाकिस्तानचा पहिला सामना दुबळ्या नेदरलँडविरुद्ध पार पडला. या सामन्यात पाकिस्तान आक्रमक खेळ दाखवेल अशी अपेक्षा होती. पण पाकिस्तानचा संपूर्ण संघ ताकही फुंकून पित होता. फहीमने शेवटी फटकेबाजी केली नसती तर कदाचित हा सामना पाकिस्तानने गमावला असता ऑस्ट्रेलियाला टी20 मालिकेत पराभूत केल्यानंतर आत्मविश्वास वाढला आहे. पण या सामन्यात तसं काही दिसलं नाही. उलट पाकिस्तानचा स्टार गोलंदाज नेदरलँडच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना अडचणीत दिसला. त्यामुळे क्रीडाप्रेमीही आवाक् झाले. नेदरलँडच्या फलंदाजांनी स्टार गोलंदाजी शाहीन आफ्रिदीची धुलाई केली. पहिल्या चेंडूपासून नेदरलँडच्या फलंदाजांनी शाहीन आफ्रिदीवर आक्रमण केलं. शाहीन पहिल्या किंवा दुसऱ्या षटकात विकेट घेईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. विकेट सोडा, धावा वाचवणं त्याला कठीण झालं. पहिल्या दोन षटकात त्याने 20 हून अधिक धावा दिल्या.

शाहीन शाह आफ्रिदी पहिलं षटक टाकण्यासाठी आला. या षटकाच्या पहिल्याच चेंड़ूवर मायकल लेविटने चौकार मारला. या षटकात एकूण 9 धावा आल्या. त्यानंतर सलमान मिर्झाने दुसरं षटकं चागलं टाकलं. तिसऱ्या षटकासाठी शाहीन आफ्रिदी पुन्हा आला आणि लेविटने संधी साधली. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पुन्हा चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर दोन धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर शाहीनने त्याला बाउंसर टाकला. पण यातही लेविटने त्याला दिवसा तारे दाखवले. त्याने पूल मारत थेट सीमेपार चेंडू पाठवला. तसेच या स्पर्धेतील पहिल्या षटकाराची नोंद केली. इतकंच काय तर चेंडू आणला तेव्हा त्याचा आकार बदलला होता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा पहिला षटकार मायकल लेविटने मारला. त्यामुळे चेंडू बदलण्याची वेळ आली.

Woah! That is a biggie! 🔥

Michael Levitt took the attack right onto PAK bowlers as he scored the first MAXIMUM of the T20 World Cup!👌🏻

ICC Men’s #T20WorldCup | #PAKvNED | LIVE NOW 👉 https://t.co/GKcXaJHm9F pic.twitter.com/vnCd4s2zbV

— Star Sports (@StarSportsIndia) February 7, 2026

शाहीनने 9 चेंडूत 21 धाव दिल्या. त्याने या सामन्यात फक्त 3 षटकं टाकली आणि 28 धावा देत 1 गडी बाद केला. डेथ ओव्हरमध्ये शेपटाचे फलंदाज फलंदाजी करत असताना कर्णधाराने 19वं षटक दिलं. या षटकात त्याला एक विकेट मिळाली. आघाडीचे फलंदाज बाद करण्याचा अपेक्षा त्याच्याकडून होती. पण काही झालं नाही. दुसरीकडे, शाहीनने 4 षटकं टाकणं अपेक्षित होतं. पण त्याचा स्पेल पाहता कर्णधार सलमान आगाने त्याच्याकडून 4 षटकं करणं टाळलं. दुसरीकडे, बाबर आझम पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • India-US Trade Deal : भारतासाठी मोठी GOOD NEWS, अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी मारलं, काश्मीरचा संदर्भ
  • किडनीचा प्रत्येक आजार होईल बरा, बाबा रामदेव यांनी सांगितले हे प्रभावी घरगुती उपाय
  • Silver Rate: चांदीच्या चकाकीला भुलू नका; तज्ज्ञांचा मोठा इशारा, चांदी लोळण घेणार?
  • T20 WC 2026 : पहिल्याच सामन्यात बाबर-शाहीनने पकडलेला झेल वादाच्या भोवऱ्यात, झालं असं की.. Video
  • UPI च्या व्यवहारात फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in