• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 WC: न्यूझीलंडची अंतिम फेरीत धडक; दक्षिण अफ्रिकेने येथे सामना गमावला, नोंदवले इतके विक्रम

March 5, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेवर एकहाती विजय मिळवला. दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान न्यूझीलंडने सहज गाठलं. 12.5 षटकात 1 गडी गमवून विजय मिळवला आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुसऱ्यांदा धडक मारली. यापूर्वी 2021 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. न्यूझीलंडने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. आता भारत किंवा इंग्लंड यापैकी एका संघांचं आव्हान असणार आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना या दोन संघात होणार आहे. विजयी संघाला अंतिम फेरीत न्यूझीलंडशी सामना करावा लागणार आहे.

सामना कुठे गमावला?

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल गमावला आणि सामना येथेच हातातून गेला. कारण दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेकीवेळी दव फॅक्टरबाबत आपलं मत नोंदवलं होतं. त्यामुळे धावफलकावर मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस केला होता. पण तसं झाला नाही. हा सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सुरुवातीला विकेट टाकल्या. त्यामुळे धावगतीला ब्रेक बसला. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्को यानसेनने 30 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी म्हणून 169 धावांपर्यंत मजल मारता आली. अन्यथा हा सामना पावरप्लेनंतरच संपला असता.

दक्षिण अफ्रिकेने पावर प्लेमध्ये लय गमावली होती. दुसर्‍या षटकात दोन विकेट लागोपाठ पडल्याने धावगतीला ब्रेक लागला. क्विंटन डीकॉक बाद झाल्यानंतर रायन रिकल्टन आला तसा तंबूत परतला. त्याला खातंही खोलता आलं नाही. तेव्हा संघाच्या फक्त 12 धावा झाल्या होत्या. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला पावरप्लेमध्ये सावध खेळावं लागलं. पावरप्लेचा खेळ संपल्यानंतर 77 धावांवर 5 विकेट तंबूत होत्या. त्यामुळे दक्षिण अफ्रिका 100 धावा करेल की नाही शंका होती. पण कसं बसं 169 धावांपर्यंत पोहोचले.

पावर प्लेमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यात दक्षिण अफ्रिकेला अपयश आलं. खरं तर दुसऱ्या षटकात टिम सेफर्टची विकेट मिळाली असती. चेंडू खूपच वर चढला होता आणि हातात झेल असता. पण क्विंटन डीकॉकने कॉल देत मागे धावला खरा.. पण झेल काही घेऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा त्याने घेतला. त्याने 33 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार मारत 58 धावांची खेळी केली. खरं तर हा झेल सीमेवर उभा असलेला खेळाडू सहज पकडू शकला असता.

De kock dropped simple catch 👀🫡 #T20WorldCup #NZvsSA pic.twitter.com/1Ume6rZRbg

— Mr Zohaib (@Zohaibfan) March 4, 2026

या सामन्यात असे विक्रम नोंदवले?

या सामन्यात फिन एलनने आक्रमक शतक ठोकलं. त्याने 20 वर्ल्डकप स्पर्धेतील ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. त्याने 47 चेंडूत शतक ठोकलं होतं. पण फिन एलनने 33 चेंडूत ही कामगिरी केली आहे. तर टी20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ग्लेन फिलिप्सचा 46 चेंडूत शतकाचा विक्रम मोडला. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं वेगवान शतक आहे. इस्टोनियाच्या साहिल चौहाने 27 चेंडूत, तर टर्कीच्या मुहम्मद फहाडने 29 चेंडूत शतक ठोकलं होतं. तर फिन एलन, जॅन लोफ्टी आणि सिकंदर रझा यांनी 33 चेंडूत शतक ठोकलं आहे. टी20 वर्ल्डकप इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक आहे. प्रतिष्ठित संघाविरुद्ध हे शतक ठोकल्याने विशेष आहे.

फिन एलनने 18 चौकार षटकार मारले. यात 10 चौकार आणि 8 षटकार होते. फिन एलनने आता टी20 विश्वचषकाच्या एका डावात संयुक्तपणे सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम केला आहे. तसेच 2012 मध्ये पल्लेकेले येथे बांगलादेशविरुद्ध ब्रेंडन मॅक्युलमने (11 चौकार, 7 षटकार) इतकेच चौकार मारले होते.

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात 150 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करताना 43 चेंडू शिल्लक ठेवले. यापूर्वी 2024 मध्ये नॉर्थ साउंड येथे स्कॉटलंडने ओमानविरुद्धच्या सामन्यात 41 चेंडू शिल्लक ठेवत 151 धावा गाठल्या होत्या.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in