• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Suryakumar Yadav : ‘त्याची मी माफी मागितली’ वर्ल्ड कप संपल्यानंतर सूर्यकुमारचा टीम इंडियातील खेळाडूबद्दल मोठा खुलासा

March 12, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने मागच्या रविवारी आयसीसी टी20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपला गवसणी घातली. या विजयानंतर भारतात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कप संपल्यानंतर आता मोठा खुलासा केला आहे. टी20 वर्ल्ड कप सुरु असताना टीम इंडियातील एक खेळाडू रागवला होता असं सूर्या बोलला. आयसीसी टी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम मधून वगळल्यामुळे उपकर्णधार अक्षर पटेल रागवला होता असं सूर्यकुमार यादव म्हणाला. भारताने सलग दुसऱ्यांदा आणि आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकलाय.

भारताने यंदा टी20 वर्ल्ड कप उंचावण्यासाठी नऊ सामने खेळले. त्यात दोन सामन्यात टीमचा उपकर्णधार असूनही अक्षर पटेलला वगळण्यात आलं होतं. अक्षर हे आवडलं नव्हतं. सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्वाच्या सामन्यावेळी अक्षर पटेलला टीममधून वगळलं होतं. टीम इंडियाने 76 धावांनी हा सामना गमावला. चाहते आणि क्रिकेट एक्सपर्ट्सनी या निर्णयावर टीका केली होती. अक्षर वगळण्याचा हा टीमचा रणनितीक निर्णय होता. पण अक्षर पटेलला हा निर्णय पटला नव्हता. आता वर्ल्ड कप संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने या बद्दल खुलासा केला आहे.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

“अक्षर खूप रागावलेला. त्याने रागावलं सुद्धा पाहिजे कारण तो टीममधील अनुभवी खेळाडू आहे. तो आयपीएलमध्ये एका टीमचं नेतृत्व करतो. तो रागावलेला. मी त्याची माफी मागितली. मी म्हटलं त्याला मी चुकलो. पण संघासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता” असं सूर्युकमार यादव इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला. अक्षर पटेल सोबतचा हा संवाद इतक सहज, सोपा नव्हता असं सूर्या म्हणाला.

“भारत-दक्षिण आफ्रिका आमच्यासाठी डोळे उघडणारी मॅच होती. मला टीमवर अजिबात डाऊट नव्हता. त्यानंतर आम्ही प्रत्येक सामना बादफेरीची मॅच असल्यासारखे खेळलो” असं सूर्यकुमार यादवने सांगितलं. झिम्बाब्वे विरुद्धचा सामना आमच्यासाठी प्री-क्वार्टर फायनल आणि वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच क्वार्टर फायनल होती.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in