• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Suryakumar Yadav : कॅप्टन सूर्याची कमाल, रायपूरमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपली

January 24, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव याला गेल्या अनेक महिन्यांपासून धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सूर्याचं सातत्याने अपयशी होणं हे चिंताजनक होतं. मात्र सूर्याने एका खेळीसह या सर्व प्रश्नांना पूर्णविराम लावला. सूर्याने न्यूझीलंड विरुद्ध 23 जानेवारीला दुसऱ्या टी 20i सामन्यात चाबूक खेळी केली. सूर्याने स्फोटक अर्धशतकासह न्यूझीलंड विरुद्ध भारताला विजय मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. सोबतच सूर्याने वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. सूर्याने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.

न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 15.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कॅप्टन सूर्याने नाबाद 82 धावा करत 468 दिवसांची प्रतिक्षा संपवली.

सूर्याला सूर गवसला

सूर्याने रायपूरमध्ये 37 बॉलमध्ये नॉट आऊट 82 रन्स केल्या. सूर्याने या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. भारताची विजयी धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी अपयशी ठरली. दोघेही बाद झाल्याने भारताची स्थिती 2 आऊट 6 अशी झाली होती. मात्र त्यानंतर सूर्याने इशान किशन आणि शिवम दुबे या दोघांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी करत भारताला विजयी केलं.

सूर्याने इशानसह तिसऱ्या विकेटसाठी 48 बॉलमध्ये 122 रन्सची वादळी भागीदारी केली. सूर्याने इशान आऊट झाल्यानंतर शिवम दुबे याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 37 चेंडुत नाबाद 81 धावांची भागीदारी करत भारताला जिंकवंलं. इशानने 76 तर शिवमने 36 धावा केल्या.

सूर्याचं जोरदार कमबॅक

सूर्याने या नाबाद खेळीदरम्यान अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावलं. सूर्याच्या टी 20i कारकीर्दीतील हे 22 वं शतक होतं. सूर्याने यासह तब्बल 23 डावांनंतर हे टी 20i अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने याआधी 12 ऑक्टोबर 2024 रोजीअर्धशतक झळकावलं होतं. मात्र त्यानंतर सूर्याला 2025 मध्ये धावांसाठी झगडावं लागलं. सूर्याला 2025 मधील 21 सामन्यांमध्ये फक्त 218 धावाच करता आल्या. मात्र सूर्याने रायपूरमधील एका खेळीसह सर्व हिशोब केला.

सूर्याकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

सूर्यकुमार यादव याने टी 20i क्रिकेटमध्ये 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याबाबत अभिषेक शर्मा याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सूर्याने रायपूरमधील अर्धशतकासह ही कामगिरी केली. सूर्याची ही 25 पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याची आठवी वेळ ठरली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in