• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Suraj Chavan: खूप मिस करतोय दादा; अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणने शेअर केला Video, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

March 6, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्याची बातमी आजही अनेकांना खरी वाटत नाही. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकाकुल झालं आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते सतत त्यांची आठवण काढत आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली आहे.
अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सामान्य माणसांचे अनेक प्रश्न सोडवले. यात ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा विजेता सूरज चव्हाणचाही समावेश आहे. अजितदादांनी सूरजसाठी घर बांधून दिलं होतं, ज्यामुळे सूरजचे आयुष्य पूर्णपणे बदललं.

काय आहे पोस्ट?

अलीकडेच सूरजने सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सूरज आणि त्याची पत्नी दिसत आहेत. सूरजने फुलांनी सजवलेली ‘दादा’ ही अक्षरे तयार केली आहेत. नवीन घरात अजितदादांचा फोटो लावून त्याच्यासमोर हात जोडले आहेत. फोटोला हार घालून आदरांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

व्हिडीओ शेअर करत सूरजने दिलेल्या कॅप्शन अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. “दादा, कायम आठवणीत राहणार तुम्ही. खूप मिस करतोय दादा” असे सूरजने म्हटले आहे. अजितदादांच्या निधनानंतर सूरजने आधीही आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. त्याने लिहिलं होतं की, “मित्रांनो माझा देव चोरला आज… मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत… माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं… माझी काळजी घेतली.. मला नवीन आयुष्य मिळवून दिलं… अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही… याचं मला लई वाईट वाटतय… लई दुःख होतंय… माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

अनेकांनी केल्या कमेंट्स

सूरजच्या या भावुक पोस्ट आणि व्हिडीओने अनेकांना हेलावून टाकलं आहे. अजितदादांच्या स्मृतीत सूरजची ही श्रद्धांजली खूपच हृदयस्पर्शी आहे. अनेकांनी या पोस्टवर अजित पवारांना आदरांजली वाहिली आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दारूसोबत चखना का खातात? कारण ऐकून पिणाऱ्याचीही झटकन उतरेल
  • Ashok Kharat | खरात मुस्लिम असता तर त्याची वरात काढली असती; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
  • मुलींचा गैरफायदा घेणं…! अक्षय कुमार बद्दल लारा दत्ताचा थक्क करणारा खुलासा
  • एकट्याने बघा हा चित्रपट, प्रचंड बोल्ड सीन, 4 वर्षांपूर्वी करण्यात आला बॅन, अचानक YouTube वर झाला व्हायरल
  • हौसेला मोल नाही ! नीता अंबानींच्या हातातली एवढीशी बॅग, त्या किंमतीत येईल 1 बीएचके फ्लॅट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in