• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunny Deol Movies : पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारे सनी देओलचे 5 चित्रपट कोणते? बॉर्डर कितव्या नंबरवर?

January 26, 2026 by admin Leave a Comment


ओपनिंग डे ला सनी देओलच्या पाचव्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचं नाव आहे 'यमला पगला दीवाना 2'. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 6.3 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं.

या लिस्टमध्ये चौथ्या नंबरवर आहे 'यमला पगला दीवाना'. हा Action कॉमेडी चित्रपट 2011 साली रिलीज झालेला. समीर कर्णिकच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने भारतात ओपनिंग डे ला 7.95 कोटी रुपयांची कमाई केली होती.

तिसऱ्या नंबवर चित्रपट आहे जाट. 2025 साली हा चित्रपट रिलीज झालेला. यात सनी देओलसह रणदीप हुड्डा आणि विनीत कुमार सिंह सारखे कलाकार होते. जाटने ओपनिंग डे ला 9.5 कोटी रुपयाचं कलेक्शन केलं होतं.

23 जानेवारीला रिलीज झालेला सनी देओलचा बॉर्डर 2 चित्रपट या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे. बॉर्डरचा सीक्वल बॉर्डर 2 ने भारतात 30 कोटी रुपयांची शानदार ओपनिंग केली आहे. या चित्रपटात वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंह, मेधा राणा आणि आन्या सिंह सारखे कलाकार आहेत.

बॉर्डर 2 ला मात्र ओपनिंग डे ला 2023 साली रिलीज झालेल्या गदर 2 चा रेकॉर्ड मोडता आला नाही. गदर 2 सनी देओलची सर्वात मोठी ओपनर फिल्म आहे. ऑगस्ट 2023 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने भारतात 40 कोटी रुपयांची ओपनिंग केलेली. जगभरात टोटल 691 कोटी रुपयांची रेकॉर्डतोड कमाई केली होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in