• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunil Tatkare: रुपाली चाकणकरांचे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद धोक्यात? सुनील तटकरे राजीनाम्याबाबत एका ओळीत उत्तर

March 24, 2026 by admin Leave a Comment


Sunil Tatkare on Rupali Chakankar: नाशिकचा भामटा अशोक खरात याची पाद्यपूजा करणे आणि त्याच्या विश्वस्तात समावेश असणे यामुळे रुपाली चाकणकर या अडचणीत सापडल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून त्यांची गच्छंती झाली. तर आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना हटवण्याची मागणी त्यांच्याच पक्षातील महिला नेत्या करत आहेत. याविषयी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वी कानावर हात ठेवले होते. योग्यवेळी याविषयी आपण मत व्यक्त करू. आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, अशी त्यांची उद्वग्निता दिसून आली होती. आता याविषयावर त्यांनी मत जाहीर केले आहे.

पक्ष निर्णय घेईल

रुपाली चाकणकर यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षाबाबत राजीनामाबाबत सुनील तटकरे यांनी एका ओळीत उत्तर दिले. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबद्दल पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल असे त्यांनी स्पष्ट केले. आज उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या. पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या. त्यामुळे बारामतीमधील पोटनिवडणुकीसह रुपाली चाकणकर यांच्या विषयी सुद्धा या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

6 एप्रिल रोजी सुनेत्रा पवार करणार अर्ज दाखल

बारमाती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 6 एप्रिल रोजी आमच्या नेत्या सुनेत्रा पवार या अर्ज भरणार आहेत. पूर्वी जी निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी अशी ती निवडणूक झाली होती. सुप्रिया सुळे यांनी उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं. त्यांचे मी आभार मानतो. जर काँग्रेसने उमेदवार द्यायचा विचार केला तर मी आणि प्रफुल पटेल काँगेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठी यांच्याशी बोलू. आमची इच्छा आहे की ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. ज्या परिस्थितीत निवडणूक होत आहे त्यामुळं ती बिनविरोध व्हावी ही इच्छा आहे

सातारा इथं जे घडलं ते चुकीचं

काल विधानसभा, विधानपरिषदेत साताऱ्यातील घटनेवर सविस्तर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री निवेदन सभागृहात बोलतील. मकरंद आबा आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री आहेत.सातारा पोलीस अधीक्षक आणि पोलीस यांनी निवडणुकीच्या दिवशी जे केलं ते सर्व चॅनल वर पाहिलं. जे घडल ते चुकीचंच आहे. आम्ही NDA मधे सगळे आहोत. एका जिल्हा परिषदेत स्थानिक पातळीवर घडलेली घटना योग्य नाही. दोन नेत्यांची बैठक झाली असेल तर त्याचा अधिकृत तपशील समोर नाही. जोपर्यंत त्या दोघांचा तपशील समजत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया देणे योग्य नाही. कोणी कोणाला इशारा दिला हा महत्वाचा भाग नाही. काहीवेळा भांड्याला भांड लागत असतं, अशी प्रतिक्रिया खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in