• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Stock Market : युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान

March 11, 2026 by admin Leave a Comment


मंगळवारी शेअर बाजारात आलेल्या रिकव्हरीनंतर बुधवारी पुन्हा एकदा शेअर बाजार जोरदार आपटल्याचं पहायला मिळालं. सेंसेक्स 1,300 अकांनी घसरला. तर निफ्टी 23,900 अकांच्या खाली बंद झाली. बीएसई टॉप 30 शेअर्स पैकी केवळ दोनच शेअरमध्ये तेजी दिसून आली. बाकी 28 शेअरमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, भारतीय एअरटेल, आणि महिंद्रा अँण्ड महिंद्रा सारख्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. सेंसेक्स 1,342.27 अंकांनी घसरून 76,863.71 वर बंद झाला. एकूण 1.72 टक्के एवढी घसरण झाली. तर निफ्टीमध्ये 394.75 अंकानी घसण झाली, निफ्टी 23,866.85 अंकांवर पोहोचली आहे. निफ्टीमध्ये देखील 1.63 टक्क्यांची घसरण झाली आहे. बँक, आटो, आयटी आणि वित्त या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळाली.

गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळत आहे. मंगळवारी गुंतवणूकदारांचा 6 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला होता, मात्र बुधवारी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला, मोठं नुकसान झालं. बीएसई मार्केटचं एकूण भांडवल मंगळवारी 447 लाख कोटी रुपये एवढं होतं. बुधवारी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. मार्केटमध्ये 5 लाख कोटी रुपयांची घसरण पहायला मिळाली. घसरणीसह मार्केट 441.90 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. मध्य पूर्वेमधील तणावामुळे सध्या गुंतवणूकदारांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. ज्याचा परिणाम हा शेअर मार्केटवर देखील झाला असून, शेअर मार्केट अस्थिर बनलं आहे. दरम्यान नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबाबत मोठं विधान केलं होतं. हे युद्ध आता लवकरच संपेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर युद्धामुळे भडकलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती किंचित प्रमाणात कमी झाल्याचं पहायला मिळालं होतं. तसेच शेअर बाजारात देखील सुधारणा दिसत होती. मात्र आज पुन्हा एकदा शेअर बाजारात घसरण पहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : होर्मुझच्या सामुद्रधुनीची सीमा किती देशांना लागून आहे? भारतापासून किती दूर?
  • मुंबई : हाय प्रोफाईल पार्टीतील जेवण पडलं महागात, तरूण-तरूणीचा गेला जीव, नेमकं काय घडलं?
  • Infinix Note 60 Pro 5G : आयफोन सारखा रंग ढंग, लाँच झाला ‘प्रो’ फिचर्सवाला जबरदस्त फोन, किंमत किती ?
  • Horoscope : 14 एप्रिल दिवस ठरणार खास, 3 राशीसांठी आला दुर्मिळ योगायोग; वाचा राशीभविष्य
  • IPL 2026 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक बदल, किती सामन्यांवर परिणाम?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in