• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Stephen Hawking : दोन बिकिनी गर्ल्स, मध्ये स्टिफन हॉकिंग, एपस्टीन फाईल्समधील त्या फोटोमुळे खळबळ!

February 25, 2026 by admin Leave a Comment


Epstein Files Stephen Hawking : गेल्या अनेक दिवसांपासून एपस्टीन फाईल्समुळे जगात खळबळ उडालेली आहे. एपस्टीन हा बाल लैंगिक गुन्ह्यातील गुन्हेगार होता. त्याने अनेक मुलींचे शोषण केले होते. याच एपस्टीनसंबंधीच्या खटल्याची कागदपत्रे अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर अमेरिकन सरकारकडून टप्प्याटप्प्यात या प्रकरणाशी निगडित फोटो, व्हिडीओ, कागदपत्रे सार्वजनिक केले जात आहेत. असे असतानाच आता प्रसिद्ध संशोधक आणि प्राध्यापक स्टिफन हॉकिंग यांच्या एका फोटोमुळे खळबळ उडाली आहे. हॉकिंग बिकिनी परिधान केलल्या दोन तरुणींसोबत दिसत आहेत.

स्टिफन हॉकिंग दोन मुलींसोबत

स्टिफन हॉकिंग यांचा हा फोटो एपस्टीन फाईल्समधील असल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे आता स्टिफन हॉकिंग हेदेखील चर्चेत आले आहेत. या फोटोमध्ये स्टिफन हॉकिंग दोन तरुणींच्या मध्ये बसलेले दिसत आहेत. या दोन्ही तरुणींनी बिकिनी परिधान केलेली आहे. दोन्ही तरुणींच्या हातात पेय आहे. तर एका तरुणीने स्टिफन हॉकिंगसमोर लाल रंगाचे एक पेय पकडलेले आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Latest Epstein drop includes this: Hawking poolside, two women in bikinis on either side, drinks in hand, big smile.
DOJ just files it away like any other photo.
He was on the island for that 2006 conference Epstein funded.
Mentions stack up in the docs, but zero follow-up.
Same… pic.twitter.com/BI2CrzTWiX

— Mr Pool (@pooL_rM311_7221) February 25, 2026

सोबत होते 21 शास्त्रज्ञ

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार एपस्टीन फाईल्समध्ये स्टिफन हॉकिंग यांचा 250 पेक्षा जास्त वेळा उल्लेख आहे. हा फोटो समोर आलेला असला तरीही स्टिफन हॉकिंग आणि एपस्टीन यांच्यात थेट संबंध होता, हे स्पष्ट होत नाही. या फोटोबाबत सांगायचे झाले तर तो फोटोदेखील नेमका कधीचा आणि कुठला आहे हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. 2018 सालीदेखील हाच फोटो समोर आला होता. आता एपस्टीन फाईल्समुळे या फोटोची सर्वाधिक चर्चा होत आहे. 2006 साली स्टिफन हॉकिंग हे अमेरिकेच्या व्हर्जिन आयलँडवर गेले होते. एपस्टीनने आर्थिक पाठबळ पुरवलेल्या एका संमेलनात भाग घेण्यासाठी त्यांच्यासोबत इतरही 21 शास्त्रज्ञ होते.

दरम्यान, एपस्टीन फाईल्समधील कागदपत्रे समोर आल्यानंतर जानेवारी महिन्यात हॉकिंग यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. हॉकिंग अनेक बाललैंगिक अत्याचारात सामील होते, असा दावा केला जातो. त्यामुळे आता या आरोपांबाबत भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in