• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SRH vs RR : राजस्थानचा हैदराबाद विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, कोणती सलामी जोडी ठरणार ‘यशस्वी’?

April 13, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमताील (IPL 2026) 21 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. राजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा पाचवा सामना आहे. राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात अजिंक्य आहे. राजस्थानने अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करत विजयी चौकार लगावला आहे. तर हैदराबादला 4 पैकी एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे हैदराबाद राजस्थानला पराभूत करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

राजस्थानचा बॉलिंगचा निर्णय

हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रियान पराग याने हैदराबाद विरुद्ध बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 2-2 बदल केले आहेत.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रेव्हीस हेड, इशान किशन (कॅप्टन आणि विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, शिवांग कुमार, प्रफुल्ल हिंगे आणि एशान मलिंगा.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (कॅप्टन), लुआन-ड्रे प्रिटोरियस, डोनोव्हन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई आण तुषार देशपांडे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik | नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन एन. चंद्रशेखर म्हणाले, गैरवर्तनाबाबत आम्ही…
  • 0..2..4..6 आणि 91! कर्णधार इशान किशनचा झंझावात, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना झोडलं
  • SRH vs MI : अरे काय करतोय हा,अभिषेक झिरोवर आऊट होताच काव्या मारनचा संताप, पाहा व्हीडिओ
  • Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेबांचे हे 15 विचार वाचताच तुमचं अख्खं आयुष्य हमखास बदलेल, 5 वा विचार वाचून…
  • ‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in