
सनरायजर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 21 व्या सामन्यात सलग 4 सामने जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्ससमोर 217 धावांचं आव्हान ठेवलं आहे. एसआरएचने कॅप्टन इशान किशन याच्या वादळी खेळीच्या जोरावर हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 216 रन्स केल्या. इशानने हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. तसेच हेन्रिक क्लासेन याने 150 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डी आणि सलील अरोरा या दोघांनी अखेरच्या क्षणी महत्त्वपूर्ण खेळी करुन हैदराबादला 200 पार पोहचवण्यात प्रमुख योगदान दिलं. त्यामुळे आता हैदराबाद घरच्या मैदानात सामना जिंकणार की राजस्थान विजयी पंच लगावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply