
आयपीएल 2026 स्पर्धेतील 17व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सविरुद्ध आक्रमक सुरूवात केली. पावर प्लेच्या सहा षटकात गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड ही जोडी मैदानात उतरली होती. पहिलं षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग आला होता. या षटकात त्याने फलंदाजांना फार काही करू दिलं नाही. या षटकात एक चौकार आला आणि 9 धावांसह षटक संपलं. पण तिसरं षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग आला आणि गोलंदाजी करणं विसरून गेला. अभिषेक शर्मा या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून स्ट्राईकला होता. त्यामुळे आधीच अर्शदीप सिंग टेन्शनमध्ये आला होता. अभिषेक शर्माने या षटकात आक्रमक खेळी करण्याची पूर्णपणे तयारी केली होती.
आयपीएल स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या अर्शदीप सिंगने पहिल्या दोन चेंडूवर सलग दोन चौकार मारले. त्यामुळे अर्शदीप सिंग दबावात आला. त्यामुळे अभिषेक शर्माच्या बॅट स्विंगपासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तिसरा चेंडू वाइड टाकला. त्यानंतर हा चेंडू परत टाकताना निर्धाव टाकला. चौथा चेंडू टाकण्यासाठी अर्शदीपला चार चेंडू टाकावे लागले. तीन सलग वाइड टाकले आणि जेव्हा योग्य चेंडू टाकला तेव्हा अभिषेक शर्माने षटकार मारला. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा अभिषेक शर्माने षटकार मारला. सहावा चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलं. या षटकात एकूण 24 धावा आल्या.आयपीएलच्या इतिहासात अर्शदीपने टाकलेल्या सर्वात महागड्या षटकांपैकी हे एक षटक ठरले. पावरप्लेच्या पहिल्या दोन षटकांत 33 धावा दिल्या, ज्यामुळे हैदराबादला दमदार सुरुवात मिळाली.
अर्शदीप सिंगला झालंय तरी काय?
अर्शदीपने त्याच्या शेवटच्या 10 आयपीएल सामन्यांमध्ये 1 ते 6 षटकांमध्ये 20 षटकं टाकली आणि एकही विकेट न घेता 216 धावा केल्या. यावेळी त्याचा इकोनॉ़मी रेट हा 10.8 चा आहे. तर 27.5% धावा चौकार षटकारातून आल्या आहेत. तसेच सलग आठ टी20 सामन्यांमध्ये या टप्प्यात एकही बळी घेऊ शकलेला नाही. त्याचा शेवटचा बळी या हंगामाच्या सुरुवातीला टी20 विश्वचषकादरम्यान अहमदाबाद येथे एडन मार्करामचा होता.
Leave a Reply