• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SRH vs MI : अरे काय करतोय हा,अभिषेक झिरोवर आऊट होताच काव्या मारनचा संताप, पाहा व्हीडिओ

April 13, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या19 व्या मोसमातील 21 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने पुन्हा एकदा निराशा केली आहे. अभिषेक शर्मा राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर ढेर झाला. राजस्थानने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हीस हेड सलामी जोडी मैदानात आली. अभिषेक स्ट्राईकवर गेला. तर राजस्थानकडून जोफ्रा आर्चर पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झाला. अभिषेक पहिल्या बॉलवर कशी सुरुवात करतो याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र जोफ्राने अभिषेकला पहिल्याच बॉलवर आऊट केलं. अभिषेक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. रवी बिश्नोई याने कोणतीही चूक न करता अभिषेकचा कॅच घेतला. अभिषेक झिरोवर आऊट होतात सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हीची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

अभिषेक असा झाला आऊट

जोफ्राने टाकलेल्या बॉलवर अभिषेकने डीप थर्ड मॅनच्या दिशेने फटका मारला. तिथे रवी बिश्नोई होता. जोफ्राने इतक्या हुशारीने हा बॉल टाकला की रवीला अभिषेकचा कॅच घेण्यासाठी जागेवरुन हालचालही करावी लागली नाही. अभिषेकच्या या शॉट सिलेक्शनवरुन काव्या मारन हीने नाराजी व्यक्त केली. तसेच काव्याने अभिषेक पुन्हा झिरोवर आऊट झाल्याने दोन्ही हाताने आश्चर्य व्यक्त केलं.

अभिषेककडून रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक

अभिषेक झिरोवर आऊट होताच त्याच्या नावावर नकोसा विक्रम झाला. अभिषेक एका वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकने याबाबतीत रोहित शर्मा याला मागे टाकलं.

अभिषेकची 2026 वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची ही सातवी वेळ ठरली. अभिषेक 2026 या वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये 18 पैकी 7 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. रोहित शर्मा 2018 साली 2018 साली 32 डावांत 6 वेळा झिरोवर आऊट झाला होता.

अभिषेकची 2026 मधील कामगिरी

अभिषेकने 2018 वर्षात 18 टी 20 सामन्यांमधील 18 डावात बॅटिंग केली आहे. अभिषेकने या दरम्यान 1 शतक आणि 5 अर्धशतकासह एकूण 452 धावा केल्या आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: कृणाल पांड्या फिरकीपटू; तरी का टाकतो बाउंसर? स्वत:च केला खुलासा
  • SRH vs RR : कॅप्टन इशान किशनचा तडाखा, राजस्थानसमोर 217 रन्सचं टार्गेट, हैदराबाद सलग पाचव्या विजयापासून रोखणार?
  • हा धातू सोन्याचा कर्दनकाळ, दागिन्यांसोबत चुकूनही एकत्र ठेवू नका, पाहा हा Viral Video
  • बाईक, सेल्फीस्टिक आणि मोबाईल लोकेशन… सोलो ट्रेकरचा मृत्यू, 300 फूट दरीत कोसळून अंत; त्या डोंगरात नेमकं काय घडलं?
  • तर भारताला सर्वात मोठा फटका, इराणकडून भयंकर संकटाची चाहूल; युद्ध न थांबवल्यास…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in