
ग्रुप 1 मधील चारही संघ आज परस्परांना भिडणार आहेत. टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चारही टीम्ससाठी विजय अत्यावश्यक आहे. पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. दुसरा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे आहे. दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिजमध्ये सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मॅचच्या निकालाकडे दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांबरोबर भारतीय चाहत्यांचं सुद्धा लक्ष असेल. कारण सुपर-8 राऊंडमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला. त्यामुळे पुढचे दोन्ही सामने भारतासाठी करो या मरो आहेत तसच नेट रनरेटच्या समीकरणाच्या दृष्टीने सुद्धा दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामना भारतासाठी महत्वाचा आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होत असल्याने टीम इंडियाला विजेतेपदाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. आज टीम इंडियाची परीक्षा आहे.
Leave a Reply