
Smriti Mandhana Higher Score: भारतीय महिला क्रिकेट टीमची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधना सरत्या वर्षात कमाल करण्याची शक्यता आहे. या सरत्या वर्षात ती मोठा रेकॉर्ड नावावर नोंदवण्याची शक्यता आहे. यंदा तिने जोरदार कामगिरी बजावली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक नावावर कोरला आहे. त्यात स्मृतीने चमकदार कामगिरी बजावली आहे. श्रीलंकेविरोधात सध्या सुरु असलेल्या टी20 मालिकेच्या चौथ्या सामन्यात तिने 80 धावांची जोरदार खेळी खेळली. यासह तिने जागतिक क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. आता तिच्यासमोर हे वर्ष संपण्यापूर्वी शुभमन गिलचा तो रेकॉर्ड इतिहासजमा करण्याचे आवाहन आहे.
2025 मध्ये एक खास रेकॉर्ड करणार
स्मृती मानधना हिने वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत तीनही फॉर्म्याटमध्ये एकूण 1703 जागतिक धावांची नोंद केली आहे. हा आकडा महिला क्रिकेटच्या कोणत्या खेळाडूला गाठता आलेला नाही. इतकेच नाही तर पुरुष आणि महिला दोन्ही वर्गात सर्वाधिक धावा करणारी ती जागतिक खेळाडू ठरणार आहे. त्यासाठी तिला अवघ्या 62 धावांची गरज आहे. सध्या भारतीय पुरुष संघाचा कर्णधार शुभमन गिल 2025 मध्ये 1764 धावा करून अव्वल स्थानी आहे.
श्रीलंकेविरोधात अखेरच्या सामन्यात मोठी संधी
भारत आणि श्रीलंकेदरम्यान पाचवा आणि अखेरच्या टी20 सामना आज, मंगळवारी खेळणार आहे. भारतीय महिला संघाने या मालिकेत 4-0 अशी आगेकूच कायम ठेवली आहे. ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. जर या सामन्यात स्मृती मानधना हिने 62 धावा केल्या तर ती या वर्षात जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरेल. महिला क्रिकेट जगतासाठी सुद्धा ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.
स्मृतीचा दबदबा
वर्ष 2025 मध्ये स्मृती मानधना हिचे एकदिवसीय सामन्यातील कामगिरी दमदार राहिली आहे. तिने या वर्षात 23 वनडे सामन्यात 110 च्या स्ट्राईक रेटनुसार, 1362 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने सरासरी जवळपास 62 इतकी आहे. स्मृतीने या वर्षात 5 शतकं आणि 5 अर्धशतकी खेळी खेळली. मोठ्या सामन्यात अंगावर जबाबदारी घेणे आणि संघाला मजबूत सुरुवात करुन देण्यात तिचा सिंहाचा वाटा राहिला आहे. टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्मृतीने आठवणीत राहिल अशी कामगिरी बजावली आहे. तिने 9 टी20 सामन्यात 341 धावा ठोकल्या आहेत. तिच्या खेळीमुळे भारतीय संघाची सुरुवात मजबूत राहिलेली आहे.
Leave a Reply