• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SL vs ENG : श्रीलंकेसाठी प्रतिष्ठेचा सामना, इंग्लंडला हॅटट्रिकपासून रोखणार?

February 3, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंका आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा सहयजमान आहे. या स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. श्रीलंका त्याआधी शेवटच्या टी 20I मालिकेत आतापर्यंत अपयशी ठरली आहे. पाहुण्या इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धची 3 सामन्यांची टी 20I मालिका आपल्या नावावर केली आहे. इंग्लंड या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे श्रीलंकेसमोर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून पराभवाची हॅट्रिक टाळण्यासह प्रतिष्ठा राखण्याचं दुहेरी आव्हान आहे.

इंग्लंडची श्रीलंकेविरुद्ध बॅटिंग

उभयसंघातील टी 20I वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सामन्याचं आयोजन हे पल्लेकेले स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशात आता श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला कमीत कमी धावांवर रोखण्याचं आव्हान आहे.

दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल, कुणाला संधी?

इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी टी 20i वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. इंग्लंड 2 तर श्रीलंकेने 3 बदल केले आहेत. फिल सॉल्ट याला दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. तर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला विश्रांती देण्यात आली आहे. सॉल्टच्या जागी बेन डकेट याचा समावेश करण्यात आला आहे. तर जोफ्राऐवजी लुक वूडला संधी देण्यात आली आहे. वानिंदु हसरंगा आणि एशान मलिंगा या दोघांना बाहेर करण्यात आलंय. त्यांच्या जागी दुषमंथा चमीरा आणि महीश तीक्षणा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच चरिथ असलंका याला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी कामिंदू मेंडिस याचा समावेश करण्यात आला आहे.

⬅ Phil Salt
⬅ Jofra Archer

➡ Ben Duckett
➡ Luke Wood

Salt misses out with a back spasm, while Archer is rested for our final T20 of the series.

🤝 @IGCom

— England Cricket (@englandcricket) February 3, 2026

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : पाथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), पवन रथनायके, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका (कर्णधार), जनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, महेश थिक्षणा, दुष्मंथा चमीरा आणि मथीशा पथीराना.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : बेन डकेट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, ल्यूक वुड आणि आदिल रशीद.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला कोणापासून धोका? महेंद्रसिंह धोनीने स्पष्टच सांगितलं
  • सावित्रीबाई-जोतीरावांचा विवाहसोहळा; ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतील बहुप्रतिक्षित क्षण
  • Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी महिलांना दिली गुड न्यूज
  • WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सला 7 विकेटने लोळवलं
  • 2025 चा सर्वात मोठा महाबकवास चित्रपट, बघता-बघता प्रेक्षक झोपले, अभिनेत्याचा अभिनय पाहून डोके फिरेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in