• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SL vs ENG: दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडचा श्रीलंकेला दणका, मालिका 2-0 ने जिंकली

February 1, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 189 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला फक्त 7.2 षटकांचा खेळ झाला आणि थांबला. कारण पावसाने हजेरी लावल्याने सामन्यात खंड पडला. तेव्हा इंग्लंडने 7.2 षटकात 2 गडी गमवून 57 धावा केल्या होत्या. जर यावेळी पाऊस थांबला नसता आणि निकाल लागला असता तर श्रीलंकेचा विजय झाला असता. कारण डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडच्या 69 धावा असण्याची गरज होती. पण त्यांच्या 57 धावा असल्याने 12 धावांनी मागे होते. त्यामुळे श्रीलंकेला विजय मिळला असता. त्यानंतर पाऊस थांबला आणि सामन्याला पुन्हा सुरूवात झाली. पण यावेळी षटकं कमी करण्याचा निर्णय घेतला. तसेच नवं टार्गेट दिलं गेलं. 17 षटकात 168 धावांंचं टार्गेट दिलं गेलं.  16.4 षटकात दिलेलं आव्हान 4 गडी गमवून पूर्ण केलं.

श्रीलंकेकडून टी20 कर्णधार दासुन शनाका वगळता सर्वांना धावांमध्ये योगदान दिलं. दासुन 6 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला. पाथुम निसंका आणि कमिल मिशारा यांनी चांगली सुरूवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. पाथुम निसंका 22 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर कमिल आणि कुसल मेंडिसची जोडी जमली. या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. कमिल 36 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. कुसल मेंडिस 17 चेंडूत 32 धावा, पवन रत्ननायकेने 22 चेंडूत 40 धावा केल्या. तर चरिथ असलंका नाबाद 28 आणि जनिथ लियांगे नाबाद 1 धावांवर राहिले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 2, विल जॅक्स 1, लियाम लिव्हिंगस्टोन 1 आणि अदिल राशीदने 1 विकेट काढली.

इंग्लंडला विजयी धावांचा पाठलाग करताना 10 धावांवर पहिला धक्का बसला. फिलिप सॉल्ट 1 धाव करून तंबूत परतला. त्यानंतर संघाच्या 38 धावा असताना जेकॉम बेथेल 13 धावा करून बाद झाला. जोस बटलरने 39 धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रूकने 12 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकार मारत 36 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे धावा आणि चेंडूमधील अंतर कमी झालं. तसेच विजयाची स्क्रिप्ट लिहिली गेली. टॉ़म बँटनने खेळ पुढे नेला आणि आक्रमक फटकेबाजी केली.  बँटनने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in