
Shreyas Iyer Comeback: श्रेयस अय्यर आणि दुखापत हे गेल्या काही वर्षात समीकरण झालं आहे. दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान असूनही खेळता येत नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात श्रेयस अय्यरची संघात नियुक्ती झाली होती. पण तिसऱ्या वनडे सामन्यात त्याला गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवळपास दोन महिने त्याला त्यातून सावरण्यात गेले. त्याची नियुक्ती न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात होणार असं बोललं जात होतं. पण आता त्यालाही खो मिळाला आहे. रिपोर्टनुसार, आता त्याची संघात नियुक्ती होणं कठीण मानलं जात आहे. श्रेयस अय्यर बंगळुरुच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये चांगली फलंदाजी करत आहे. पण त्याच्या पुनरागमनाचं तारीख पुढे गेल्याचं दिसत आहे.
31 वर्षीय श्रेयस अय्यरची 28 डिसेंबरला रिटर्न टू प्ले टेस्ट झालं. त्यात पास झाला खरा, पण अजूनही फिटनेस हवं तसं नाही. अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही. सेंटर ऑफ एक्सीलेंसच्या वैद्यकीय टीमच्या मते, श्रेयस अय्यर अजून तरी पूर्ण क्षमतेने परतलेला नाही. सीओईच्या मते, अय्यरच्या बॅटिंगमध्ये काही अडचण नाही. पण त्याचे मसल्स पहिल्याच्या तुलनेत कमी झालेत. श्रेयस अय्यरला 9 जानेवारीला फिटनेस क्लियरन्स मिळण्याची शक्यता आहे. वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी दोन दिवसाआधी त्याला क्लियरन्स मिळेल. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. त्याच्या जागी ऋतुराज गायवाडला संधी मिळू शकते. श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीतही खेळला नव्हता. आता अय्यर 3 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईसाठी लीग सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘त्याच्या फलंदाजीत काही अडचण नाही. पण ऑस्ट्रेलियात झालेल्या दुखापतीमुळे त्याचं वजन जवळपास 6 किलोने कमी झालं आहे. सध्या त्याने काही वजन वाढवलं आहे. पण मसल्समध्ये कमतरता दिसत आहे. त्यामुळे त्याच्या ताकदीवर परिणाम झाला आहे. वैद्यकीय टीम अय्यरच्या तब्येतीबाबत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. कारण अय्यर वनडे संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला बरं होण्यासाठी आणखी काही काळ जाईल. न्यूझीलंडविरुद्धच्या वनेड मालिकेत संघ निवडण्यापूर्वी याची माहिती दिली जाईल.’
Leave a Reply