
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकीय पक्षांमध्ये नेहमीच वादविवाद पहायला मिळतात मात्र कधी कधी पक्षांतर्गत मतांतर ही स्पष्ट दिसून येतात. अलीकडे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यात काही बिनसलं आहे का? अशी शंका उपस्थित झाली आहे. शिवसेनेच्या आढावा बैठकीतील एका घटनेमुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेना आढावा बैठकीत संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तारांमध्ये दुरावा पहायला मिळाला आहे. संजय शिरसाट व्यासपिठावर आल्यानंतर सर्व आमदारांनी हस्तांदोलन केलं. मात्र अब्दुल सत्तार यांनी हस्तांदोलन करणं टाळल्याचं दिसून आलं आहे. या बौठकीत दोन्ही नेते एकमेकांच्या शेाजारी बसले होते तरी त्यांनी आपसात बोलणं टाळलं. यावरून अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
Leave a Reply