
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी विधानपरिषदेवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, जर उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेत जायचे असेल, तर त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा लागेल.
या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. कोळी म्हणाले, “कोण नरेश म्हस्के? नरेश म्हस्के हे ठाणे जिल्ह्यास लागलेला कलंक आहे. ठाणे जिल्ह्याला लागलेली दारिद्र्य आहे. नरेश म्हस्के म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या तुकड्यावर जगणारा व्यक्ती आहे.” शरद कोळी यांनी पुढे सांगितले की, “नरेश म्हस्के यांनी त्यांच्या औकातीत राहूनच बोलणे योग्य ठरेल.” राजकीय वाद आणि अशा प्रकारच्या टीकास्त्राबद्दल विधानपरिषदेत या प्रकरणावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
Leave a Reply