• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shadab Zakati : शादाबने माझ्याबरोबर व्हिडिओ बनवले, मागची दीडवर्ष तो माझ्यासोबत..फेमस यूट्यूबरवर विवाहित महिलेचा गंभीर आरोप

February 5, 2026 by admin Leave a Comment


यूट्यूबर शादाब जकाती पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका महिलेने शादाब जकातीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मला जबरदस्ती बंधक बनवून ठेवलं तसच मला धमकावून माझ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले असा गंभीर आरोप केला आहे. महिलेने शादाबच्या पत्नीवर सुद्धा मारहाणीचा आरोप केलाय. महिलेने अनेक व्हिडिओमध्ये शादाब जकातीसोबत काम केलय.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची छत्तीसगडची राहणारी आहे. महिलेच्या म्हणण्यांनुसार तिचा पती मजुरीचं काम करतो. पैसा कमावण्यासाठी आणि आपलं सोशल मिडिया अकाऊंट प्रमोट करण्यासाठी शादाब जकातीसोबत तिने चर्चा केली होती. शादाब जकातीने आपल्यासोबत अनेक व्हिडिओ बनवले पण पैसे दिले नाहीत असं महिलेचा आरोप आहे.

दीड वर्ष माझ्याशी चुकीचं वागतोय

शादाबने माझ्यासोबत अनेक व्हिडिओ बनवले. पण माझं पेज प्रमोट केलं नाही किंवा मला व्हिडिओचे पैसे दिले नाहीत. शादाब जकाती त्या बहाण्याने मागचं दीड वर्ष माझ्याशी चुकीचं वागतोय. या दरम्यान शादाब जकातीने मला बंधक बनवलं व माझ्याशी धमकावून शारीरिक संबंध ठेवले.

हिंदू युवकासोबत लग्न झालय

पीडित महिला याबद्दल तक्रार करण्यासाठी जेव्हा शादाब जकातीच्या बायकोकडे गेली. त्यावेळी तिने सुद्धा मारहाण केली. पीडित महिलेचं सोशल मिडिया अकाऊंट आहे. तिचं सोनू नावाच्या हिंदू युवकासोबत लग्न झालय. मेरठचे इंचौली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

पत्नीसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्यामुळे मोठा वाद

यूट्यूबर शादाब जकातीवर याआधी सुद्धा अशाच प्रकारचे गंभीर आरोप झाले आहेत. मागच्यावर्षी अल्पवयीन मुलगी आणि पत्नीसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्यामुळे मोठा वाद झाला होता. या प्रकरणी IT कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर जकातीने माफी मागितली व व्हिडिओ हटवला. या प्रकरणी त्याला अटक सुद्धा झाली होती.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणची मोठी चाल! पाकिस्तानात जाण्यासाठी वापरलं ते विमान, प्रत्येक सीटवर… कलीबाफ यांनी नेमकं काय केलं?
  • Volkswagen Taigun Facelift : जबरदस्त लूक आणि हायटेक फीचर्ससह नवी टाइगुन सादर, पाहा काय आहे खास?
  • ‘ही’ खास बाईक लॉन्च, किंमत ऐकून व्हाल थक्क, पाहा भारतात कधी येणार स्वस्त मॉडेल
  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in