• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Saskhi MS Dhoni Video : अगं बाई.. खाली बस, आऊट नाहीये तो ! आनंदाने नाचणाऱ्या साक्षीला धोनीने बसवलं शांत, सगळ्यांना हसू अनावर

March 6, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील वानखेड़े स्टेडियमवर टी 20 वर्ल्डकमधील भारत वि. इंग्लंड हा हायव्होल्टेज सामना झाला. भारताने इंग्लंडला हरवून फायनलमध्ये ध़क मारली. आता 8 मार्च रोजी न्युझीलंड आणि भारत यांच्या विजेतेपदासाठी लढत होणार असून विजेता संघ हा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावणार आहे. भारत वि. इंग्लंड हा सामना पाहण्यासाठी काल वानखेडेवर अनेक सेलिब्रिटी, तसेच क्रिकेटरही हजर होते, यावेळी कॅप्टन कूल, माही अर्थात महेंद्रसिंग धोनीन यानेही मॅचचा आनंद लुटला.
या सेमीफायनलदरम्यान एमएस धोनीची पत्नी साक्षी हिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मॅचच्या शेवटच्या काही षटकांदरम्यान तिने एका चेंडूवर विकेट पडल्याचा विचार करत आनंद साजरा केला, मात्र तो खरा ाऊट नव्हता. साक्षी नाचायला लागलेली पाहून धोनी हसायला लागला आणि त्याने तिला शांत केलं. बुमराहच्या गोलंदाजी दरम्यान घडलेल्या या मजेशीर क्षणाचा व्हिडीओ पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाला आहे.

साक्षी -धोनीचा क्युट व्हिडीओ व्हायरल

18 व्या षटकांत बुमराह गोलंदाजी करत होता, तेव्हा ही मजेशीर घटना घडली. खरंतर, सॅम करनने त्या 18 व्या ओव्हरमधील पहिला चेंडू बुमराहकडे वळवला. ते पाहून साक्षीला वाटलं की बुमराहने झेल टिला आणि भारताला विकेट मिळाली. तेपाहून ती उभी राहून आनंदाने टाळ्या वाजवायला लागली, खूप खुश झाली. पण प्रत्यक्षात, चेंडू बॅटला लागल्यानंतर एकदा जमिनीवर आदळला होता, त्यानंतर बुमराहने तो कॅच टिपला, त्यामुळे फलंदाज आऊट झाला नाही आणि भारताला विकेटही मिळाली नाही.

साक्षीचं सेलिब्रेशन सुरू असताना धोनी तिच्या मागेच उभा होता. तिला झालेला आनंद पाहून आधी तो हैराण झाला आणि नंतर हसत हसतच त्याने तिला शांत केलं. विकेट मिळाली नाहीये, फलंदाज बाद नाहीये असं सांगत त्याने तिला शांत करत खाली बसायला सांगितलं. धोनीने ज्या पद्धीतने साक्षीला ते सांगितलं, तो मजेशीर क्षण आता व्हायरल झाला असून चाहत्यांना हा अंदाज खूप आवडला आहे. धोनी स्वतः देखील साक्षीच्या सेलिब्रेशनवर हसताना होता आणि आजूबाजूच्या लोकांनाही हसू आवरलं नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत.

 

Funniest moment of the match when Sakshi bhai started celebrating the bump catch pic.twitter.com/Do0SK2WWYo

— Sunil The Cricketer (@1sInto2s) March 5, 2026

भारताचा दणदणीत विजय

कालच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला. एका उच्च धावसंख्येच्या सामन्यात भारताने इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला 7 विकेट गमावून केवळ 246 धावा करता आल्या. हा भारताचा चौथा टी20 वर्ल्डकप फायनल सामना असेल. न्युझीलंडच्या संघाशी भारतीय खेळाडू भिडणार आहेत. सर्वांच लक्ष आता 8 मार्चच्या सामन्याकडे लागलं आहे.

या सेमीफायनल मॅचमध्ये अनेक मोठे विक्रम रचले गेले. टीम इंडियाने चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला. भारतीय संघ टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठणारा संघ बनला आहे. 2007, 2014, 2024 नंतर आता परत 2026 ला टीम इंडिया फायनलमध्ये आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचण्याची ही चौथी वेळ आहे. या सामन्यात एकूण 34 षटकार मारण्यात आले, जे एका टी20 वर्लडकप सामन्यातील सर्वाधिक आहेत. यापूर्वी, याच विश्वचषकात वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात एकूण 31 षटकार मारण्यात आले होते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in