• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sara Ali Khan साठी केदारनाथचे दरवाजे बंद! महिला खासदार म्हणाल्या, ‘सनातनी आहे… लिहिण्यास हरकत…’

March 18, 2026 by admin Leave a Comment


Sara Ali Khan Badri Kedar Darshan: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री महादेवाची भक्त आहे. तिच्या ‘केदारनाथ’ या पहिल्या सिनेमापासूनच अभिनेत्रीता बाबा केदारनाथांवर गाढ श्रद्धा आहे आणि ती त्या स्थळाला वारंवार भेट देते. शिवाय सारा तिच्या यात्रेचे फोटो आणि व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. फक्त केदारनाथच नाही तर, सारा उज्जैन आणि इतर ज्योतिर्लिंगांनाही भेट देते. सोशल मीडियावर वारंवार ट्रोल होत असूनही, साराच्या श्रद्धेची आणि साधेपणाची प्रशंसा केली जाते. पण आता सारा अली खान हिचे केदारनाथ येथील दरवाजे बंद करण्यात आले आहेत, जोपर्यंत सारा ‘मी सनातनी आहे…’ असं प्रतीज्ञापत्रात लिहून देत नाही…

सांगायचं झालं तर, बद्री – केदार समितीने एक नवीन नियम लागू केला आहे. ज्यामध्ये जे हिंदू नाहीत पण, त्यांना केदारनाथ येथे दर्शन घ्यायचं आहे, त्यांना एक प्रतिज्ञापत्र समितीला द्यावं लागणार आहे. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या हिंदू धर्मावरील श्रद्धेचा पुरावा सादर करावा लागेल. हा आदेश केदारनाथला वारंवार भेट देणाऱ्या सारा अली खानसह सर्व गैर-हिंदू पर्यटकांना लागू करण्यात आला आहे.

 

#WATCH | ” Sab sanatani hain…Yahan jo bhi hain sanatani hain…Wo bhi sanatani hai, so why fear in writing down the truth,” says BJP MP Kangana Ranaut, on reports of Badrinath, Kedarnath Temple Committee Chairman asking actor Sara Ali Khan to submit an affidavit to offer… pic.twitter.com/Zz5V4bsnai

— ANI (@ANI) March 18, 2026

 

आता यावर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी देखील स्वतःचं मत मांडलं आहे. कंगना म्हणाल्या, ‘येथे जे कोणी आहेत, ते सगळे सनातनी आहेत. सनातन धर्माचा शेवट नाहीये… सर्व धर्म हजार, पंधरा हजार पूर्वीचे आहे. पण फक्त सनातन सत्य आहे… ती (सारा) देखील सनातनी आहे… तर लिहून देण्यास काय हरकत आहे.. तिने सनातनी आहे.. असं लिहून द्यावं…’, असं देखील कंगना म्हणाल्या.

सांगायचं झालं तर, बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितल्यानुसार, ‘जे भक्त हिंदू नाहीत, पण त्यांची महादेवावर श्रद्धा आहे, त्यांना सनातनी असल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. सनातन धर्मावर विश्वास ठेवणारे आणि ‘मी सनातनी आहे, माझा हिंदुत्वावर विश्वास आहे’ असे लेखी निवेदन सादर करणाऱ्या गैर-हिंदू भक्तांचं स्वागत आहे.’, असं देखील हेमंत द्विवेदी म्हणाले आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात
  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in