• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanjay Raut : सीजफायरचं श्रेय पाकिस्तानला जाताच राऊत खूप जिव्हारी लागणारं बोलले, जयशंकर माकड, मोदी टेलिफोन ऑपरेटर

April 8, 2026 by admin Leave a Comment


“संपूर्ण जगाचा विद्धवंस होईल अशा पद्धतीच हे युद्ध सुरु होतं. हजारो लोक मारले गेले. आखाती राष्ट्रामधल्या दुबई, कुवैत, बहरीन, इस्रायल अशा अनेक ठिकाणी शेकडो लोकं मारली गेली. पण इराण सारखा देश हा इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना शरण गेला नाही. 35 दिवसापेक्षा जास्त काळ अमेरिका, इस्रायलला झुंजवत ठेवलं. अमेरिका, इस्रायलविषयी जी फालतू भिती होती ती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं, राज्यकर्त्यांनी, जनतेने कसं बलिदान करावं हे इराणने जगाला दाखवून दिलं” असं संजय राऊत म्हणाले. “तरीही इराणचं नुकसान झालं. इस्रायलच त्याहून जास्त नुकसान झालं. अमेरिकेच्या ट्रम्प सारख्या झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला. पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचं श्रेय पाकिस्तानला जातय. चीन मोठा देश आहे. पाकिस्तानला श्रेय जातय. पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला आहे या निमित्ताने” असं संजय राऊत म्हणाले.

“हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं. हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं. महाविश्वगुरुला मिळायला पाहिजे होतं. ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचे नेतन्याहू यांना आम्ही एकाटेबलावर आणलं. जगाला शांततेचा संदेश दिला. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरुंना का मिळाल नाही? कारण त्यांना कोणतीची भूमिका नाही. जगात युद्ध सुरु आहे आणि महाविश्वगुरु केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू या ठिकाणी आपल्या राजकीय विरोधकांवर बॉम्ब टाकत होते. शब्द, तोंडी बॉम्ब टाकत होते” अशा शब्दात राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

तर टेलिफोन ऑपरेटरच काम केलं

“भारताची अवस्था या काळात मोदींमुळे डरपोक उंदरासाखी झाली आहे. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानचे पंतप्रधान काय करत होते, तर टेलिफोन ऑपरेटरच काम केलं. युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तानला मिळालं. ज्या पाकिस्तानबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, आम्ही दलाल राष्ट्र नाही. त्या दलाल राष्ट्राला ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचं श्रेय दिलं. जयशकंर यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रुला कमी लेखताय. जयशंकर सारखी माकडं आहेत. त्यांना दूर केल पाहिजे त्यांच्यामुळे नाचक्की झाली आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RR : मुंबई इंडियन्स हरल्यानंतर हार्दिक पंड्याने वैभव सूर्यवंशीबद्दल एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल केली की तो..
  • IPL 2026 : वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमनेसामने! टीम इंडियासाठी महत्त्वाचा सामना
  • जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होता, तिथेच..संजय राऊतांचे बोचरे शब्द
  • मराठमोळ्या अभिनेत्रीचं अपहरण, 3 महिने एकाच ठिकाणी डांबून ठेवलं आणि… स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुखरुप सुटका
  • Weather Alert : आज रात्री येणार मोठी आफत… यावेळचं संकट मोठं, वेधशाळेचा इशारा; या राज्यांना मोठा धोका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in