• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanjay Raut | शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; पवारांच्या पोस्टरवरून संजय राऊतांचे विधान चर्चेत

April 13, 2026 by admin Leave a Comment


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या एका सोशल मीडिया पोस्टरवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पोस्टरमध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांचा फोटो दिसत होता. मात्र काही वेळातच तो फोटो हटवण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, “शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही कितीही मोठे झाले असाल —अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील — पण तुम्ही आज राजकारणात ‘पवार’ म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे आहात. याचा विसर पडता कामा नये.” पुढे बोलताना राऊत यांनी ठाकरे घराण्याचाही उल्लेख केला. “आम्ही सगळे ‘ठाकरे’ या नावामुळे आहोत आणि त्या नावाला वैभव आणि गौरव बाळासाहेब ठाकरे यांनी मिळवून दिला. ते नसते तर आम्ही काय?” असे ते म्हणाले.
तसेच, “आडनावाला महत्त्व नसते, तर त्या नावाला पूर्वसुरींनी दिलेल्या योगदानाला महत्त्व असते. बारामती म्हणजे शरद पवार हे लक्षात ठेवा. आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कोणालाही पुढे केले असेल, पण शरद पवार नसते किंवा त्यांनी बारामती उभी केली नसती, तर पुढील पिढीतील कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात स्थान मिळाले नसते,” असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर
  • Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • Oil Crisis : बांग्लादेशवर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही
  • Hardik Pandya vs Krunal Pandya : पंड्या ब्रदर्समधली फूट चव्हाट्यावर ? ना हँडशेक, आऊट झाल्यावर आक्रमक सेलिब्रेशन, हार्दिक-कृणालचं काय बिनसलं ?
  • ‘मी तिच्यासोबत पळूनच गेले असते…’ आशा भोसलेंना आवडायची ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in