
सांगली शहरातील टिळक चौकात काल रात्री मोठा अपघात घडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, मध्यधुंद अवस्थेत असलेला एका कार चालकाने आपल्या इनोव्हा गाडीने चौकात उभ्या राहणाऱ्या 15 ते 16 जणांना धडक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसह जवळच असलेल्या रिक्षा स्टॅंडवरील लोकांना, तसेच चार ते पाच पोलिसांना देखील धडक दिली आहे.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कार चालकाला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या वाहनाची तोडफोड केली. आरोपी चालकाला चोप देत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे सांगली शहरात वाहतूक व्यवस्थेवर आणि रस्त्यावरील सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, अशा अपघातांना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि रस्त्यावर सुरक्षा वाढवावी.
Leave a Reply