• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sachin Tendulkar Family : तेंडुलकरांच्या कुटुंबात सर्वाधिक शिक्षण कोणाचं ? किती शिकल्ये नवी सूनबाई सानिया ?

March 11, 2026 by admin Leave a Comment


सचिन तेंडुलकरच्या घरात नुकताच लग्नसोहळा पार पडला. मुलगा अर्जुन याच्याशी लग्न करून सूनबाई सानियाने तेंडुलकरांच्या बंगल्यात गृहप्रेवश केला. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी,तसेच क्रिकेटर्स उपस्थित होते. सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्याती सर्वांनाच उत्सुकता असते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य किती शिकलेत आणि नव्या सूनबाईस सानियाचं शिक्षण किती झालंय ते जाणून घेऊया. (Photos : Social Media)

सचिनच्या कुटुंबातील सर्वांनी उच्च शिक्षण घेतलं पण सचिनने मात्र अगदी लहान वयातच क्रिकेटला करिअर म्हणून स्वीकारले. त्याने मुंबईतील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. पण तो नंतर क्रिकेटमध्ये इतका रमला की महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकला नाही. मात्र, क्रिकेटमधील त्याच्या अमूल्य योगदानाची दखल घेत, त्याला नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठासह अनेक संस्थांकडून मानद डॉक्टरेट मिळाली.

सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर ही कुटुंबातील सर्वात शिक्षित सदस्य आहे. अंजली व्यवसायाने बालरोगतज्ञ आहे. तिने मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि मुंबई विद्यापीठातून बालरोगशास्त्रात सुवर्णपदक मिळवलंय.ती एका सुशिक्षित कुटुंबातून आली असून तिने बराच काळ वैद्यकीय क्षेत्रात कामही केलंय.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. मात्र, अर्जुनने शिक्षणासोबतच क्रिकेटचा गांभीर्याने अभ्यास केला, स्थानिक पातळीवर गोव्याकडून खेळला आणि आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले.

आपल्या भावाप्रमाणेच, सारा तेंडुलकरनेही मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) मधून बायोमेडिकल सायन्सेसमध्ये बॅचलर पदवी मिळवली. ती सध्या आरोग्य क्षेत्रातील ॲक्टिव्हिटीज आणि तिच्या वडिलांच्या फाउंडेशनमध्ये सहभागी आहे. काही दिवसांपूर्वीच तिने पिलाटे स्टुडिओ ओपन केला.

तर सचिन अंजलीची सून, अर्जुनची पत्नी सानिय चंडोक ही देखील बरीच शिकली आहे. सानिया चांडोकने अभ्यासासोबतच व्यवसायातही प्रसिद्धी मिळवली आहे. तिने लंडनमधील टॉप लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून तिचे शिक्षण पूर्ण केले, जे जगातील टॉप शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. सानियाने स्वतःला अभ्यासापुरते मर्यादित ठेवले नाही तर तिने मुंबईत Mr Paws नावाचे एक प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर देखील स्थापन केले. तिचा ब्रँड पाळीव प्राण्यांची काळजी आणि लक्झरी सेवांसाठी ओळखला जातो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शुटिंग सुरू असतानाच शिल्पा शेट्टीची पाठ जळाली, तरीही काम सुरू; अभिनेत्री म्हणाली…
  • Vastu Shastra : अक्षय तृतीयेला देवघरात ठेवा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
  • एकही रुपया खर्च नाही, झटक्यात नाहीसे होईल कोळ्याचे जाळे, फक्त वापरा किचनमधील ही एक…
  • IPL 2026, SRH vs PBKS : पंजाब किंग्सने हैदराबादला 6 गडी राखून नमवलं, तिसऱ्या विजयाची नोंद
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in