
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 52 सामन्यानंतर उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले. यंदा गतविजेता इंडिया, गतउपविजेता दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या 4 संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात आज 4 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार मिचेल सँटनर याने फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेज करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायक सामन्यासाठी दोन्ही संघांकडून बदल करण्यात आले आहेत.
Leave a Reply