
न्यूझीलंडने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. न्यूझीलंडने कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये दक्षिण आफ्रिकेवर उपांत्य फेरीतील सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर 170 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान फिन एलन याच्या नाबाद शतकाच्या जोरावर 43 बॉलआधी पूर्ण केलं. न्यूझीलंडने 12.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 173 रन्स केल्या.
Leave a Reply