• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Russia-India: खरंच भारत, रशियाकडून इंधन खरेदी करणार बंद? ट्रम्प यांनी तर केलं जगजाहीर, सत्य काय?

February 3, 2026 by admin Leave a Comment


Russia India Crude Oil : भारत आणि अमेरिकेदरम्यान बहुप्रतिक्षित व्यापारी करारावर शिक्कामोर्तब झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात याविषयी फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर या व्यापारी कराराची घोषणा करण्यात आली. या व्यापारी करारानंतर भारतावर अमेरिकेने लादलेले 50 टक्के टॅरिफ आता थेट 18 टक्क्यांवर आले आहे. तर येत्या काही दिवसात टॅरिफ अगदी शून्यापर्यंत येईल असे आश्वासनही ट्रम्प यांनी दिले आहे. तर त्याचवेळी भारत आता रशियाकडून इंधन खरेदी करणार नाही असा दावाही ट्रम्प यांनी जगजाहीर केला आहे. भारत व्हेनेझुएलाकडून इंधन खरेदी करू शकतो असा पर्यायही ट्रम्प यांनी सुचवला. भारताने यावर अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. पण खरंच भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार का? याची चर्चा होत आहे.

रशिया भारताचा पक्का मित्र

रशिया हा कायम भारताच्या पाठीशी उभा ठाकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराविरोधात पुतीन यांनी कायम भारताची पाठराखण केली. इतकेच नाहीतर भारत दौऱ्यावर येत पुतीन यांनी मोठा संदेशही दिला. भारतासाठी व्यापाराची दारं खुली केली. 2019 ते 2023 या काळात भारताने रशियाकडून 36 टक्क्यांपर्यंत शस्त्रास्त्र खरेदी केली. तर गेल्या चार वर्षांपासून रशिया भारताला अत्यंत स्वस्त दरात इंधन, कच्चे तेल विक्री करत आहे. हा सौदा भारतासाठी सर्वात लाभदायक आणि फायदेशीर ठरला आहे. 2024-2025 या दरम्यान रशियासोबत भारताने 131 अब्ज डॉलरचा व्यापारी करार केला आहे. तर अमेरिकेकडील भारताचा कल कमी होत असल्याने ट्रम्प यांचे डाव त्यांच्यावर उलटला. त्यामुळे त्यांनी आढेवेढे घेत का होईना टॅरिफ 18 टक्क्यांवर आणले आणि त्यात अजून कपातीचा संदेश दिला.

भारत त्याच्या गरजेच्या एकूण 88 टक्के इंधन हे आयात करतो. तर 2024-25 याकाळात भारताने एकूण तेल आयातीत रशियाकडून 35 टक्के तेल खरेदी केले. रशियावर पश्चिमी देशांनी प्रतिबंध घातला आहे. त्याचा फायदा भारताला मिळाला. रशियाने स्वस्तात इंधन पुरवठा केला. भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिकेने हरएक प्रयत्न केले. पण अखेर ट्रम्प यांना झुकते माप घ्यावे लागले. रशिया हा भारताचा सच्चा आणि पक्का मित्र असल्याचे अनेक कठीण प्रसंगी समोर आले आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचे आवाहन केलेले आहे. आताच्या ताज्या घडामोडीविषयी भारत सरकारने ट्रम्प यांच्या आभार मानले असले तरी रशियाकडून तेल खरेदीबाबत मात्र ट्रम्प यांचा दावा खोडलेला नाही, त्याचे खंडन केलेले नाही अथवा रशियाकडून तेल खरेदी केल्याचे ही अधिकृतपणे सांगितलेले नाही. त्यामुळे याविषयीचा संभ्रम कायम आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणे अशक्य असल्याचे तज्ज्ञ म्हणत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या
  • मोठी बातमी! युद्धात मोठं ट्विस्ट, अमेरिका आता थेट इराणमध्ये थेट सैन्य घुसवणार? युद्धात नव्या बलाढ्य देशाची उडी, होणार मोठा खेळ
  • 24 कॅरेट सोने नेहमीच ‘सर्वात शुद्ध’ नसते ? सोने खरेदी करताना 995, 999 आणि 999.9 याचा फरक जाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in