• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs SRH: मराठमोळ्या प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीला काढलं शून्यावर, एका षटकात काढल्या 3 विकेट

April 13, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील 21वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यानत नाणेफेकीचा कौल गमावल्याने सनरायझर्स हैदराबादच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण त्यानंतर कर्णधार इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी डाव सावरला. त्यांच्या खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने 216 धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी 217 धावांचं आव्हान दिलं. खरं तर राजस्थान रॉयल्स संघ समोर असल्याने हैदराबादच्या चाहत्यांची धाकधूक वाढली होती. कारण त्यांच्याकडे आक्रमक फलंदाजांची फौज आहे. तसेच आतापर्यंतच्या सामन्यात त्यांनी तशी फलंदाजी केली आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी हा इम्पॅक्ट प्लेयर होता. त्यामुळे धाकधूक वाढली होती. कर्णधार इशान किशनने यावेळी पदार्पण करणाऱ्या प्रफुल हिंगेकडे चेंडू सोपवला. मराठमोळ्या नागपूरच्या प्रफुल हिंगेने त्याचा विश्वास सार्थकी लावला आणि पहिल्याच षटकात राजस्थानला बॅकफूटवर ढकललं.

प्रफुल हिंगे गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा स्ट्राईकला यशस्वी जयस्वाल होता. त्याने एक धाव घेतली आणि वैभव सूर्यवंशीला स्ट्राईक दिली. समोर वैभव सूर्यवंशी होता. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून प्रहार करणार हे नक्की होतं. पण प्रफुल हिंगेकडे गमवण्यासारखं काहीच नव्हतं. तर वैभव सूर्यवंशीवर अपेक्षांचं ओझं होतं. प्रफुलने पहिलाच चेंडू आखुड टप्पयाचा टाकला आणि वैभव सूर्यवंशी जोरदार प्रहार करण्याच्या नादात झेल बाद झाला. नितीश कुमार रेड्डीने त्याचा झेल पकडण्यात कोणतीच चूक केली नाही. त्यानंतर ध्रुव जुरेल फलंदाजीला आला आणि एक चेंडू खेळला. त्यानंतरच्या चेंडूवर प्रफुलने त्याच्या दांड्या उडवल्या. दोन विकेट पडल्यानंतर ल्हुआन्ड्रे प्रिटोरियस फलंदाजीला आला. त्याने पहिलं खेळून काढला पण शेवटच्या चेंडूवर झेल बाद झाला.

प्रफुल हिंगेने पहिल्या षटकात फक्त 1 धाव देऊन तीन विकेट काढल्या. यात वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि ल्हुआन्ड्रे प्रिटोरियस यांना खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे पावरप्लेमध्येच राजस्थान रॉयल्सच्या धावगतीला ब्रेक लागला. तीन विकेट पहिल्याच षटकात पडले. तर दुसऱ्या षटकात हिंगेसारखा पदार्पण करणारा साकिब हुसैनने यशस्वी जयस्वालची विकेट काढली. यशस्वी जयस्वाल 5 चेंडूत 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या षटकात प्रफुल हिंगेने कर्णधार रियान परागची विकेट काढली. त्यामुळे पदार्पणाच्या सामन्यातच हिंगेने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली.

कोण आहे प्रफुल हिंगे?

प्रफुल हिंगेराज्य क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळतो. 24 वर्षीय हिंगेने 2024-25 हंगामात सर्व प्रकारांमध्ये वरिष्ठ स्तरावर स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केलं.10 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये हिंगेने 26.66 च्या सरासरीने 27 बळी, लिस्ट ए मधील सहा सामन्यांमध्ये पाच बळी घेतले. तर एकमेव टी20 सामना खेळला असून त्यात त्याने एक बळी घेतला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण – अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
  • CSK vs KKR Live Streaming : चेन्नई-केकेआरमध्ये 2 गुणांसाठी टफ फाईट, सामना किती वाजता?
  • GK : होर्मुझच्या सामुद्रधुनीची सीमा किती देशांना लागून आहे? भारतापासून किती दूर?
  • मुंबई : हाय प्रोफाईल पार्टीतील जेवण पडलं महागात, तरूण-तरूणीचा गेला जीव, नेमकं काय घडलं?
  • Infinix Note 60 Pro 5G : आयफोन सारखा रंग ढंग, लाँच झाला ‘प्रो’ फिचर्सवाला जबरदस्त फोन, किंमत किती ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in