• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या

April 10, 2026 by admin Leave a Comment


पावसाच्या विश्रांतीमुळे आणि ग्राउंड स्टाफच्या कठोर मेहनतीनंतर अखेर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 16 व्या सामन्यात विलंबाने का होईना मात्र टॉस झाला. टॉस होण्याची नियमित वेळ ही संध्याकाळी 7 वाजताची आहे. मात्र पावसाने 60 मिनिटं अर्थात 1 तास वाया घालवला. मात्र ग्राउंड स्टाफने घेतलेल्या मेहनतीमुळे रात्री 8 वाजता अखेर टॉस झाला. होम टीम राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध टॉस जिंकला. राजस्थानचा कॅप्टन रजत पाटीदार फिल्डिंगचा निर्णय घेतला. अधिकृत माहितीनुसार टॉसनंतर 15 मिनिटांनी अर्थात 8 वाजून 15 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार होती. मात्र पावसाने पुन्हा खोडा घातला. टॉसनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली.

पावसाच्या या संततधारेमुळे आता खेळाला सुरुवात होण्यास आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. सामन्याला सव्वा 8 वाजता सुरुवात झाली असती तर 20 षटकांचा खेळ होणार होता. मात्र आता सामन्याला किता वाजता सुरुवात होणार? याची अपडेट समोर आली आहे. अधिकृत माहितीनुसार, पावसामुळे 25 मिनिटं वाया गेली आहेत. त्यामुळे पावसाने पु्न्हा विघ्न घातल्यास 8 वाजून 40 मिनिटांनी खेळाला सुरुवात होईल.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (कॅप्टन), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई आणि ब्रिजेश शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग आणि जोश हेझलवूड.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in