• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs RCB Live Streaming : आरसीबी-राजस्थान आमनेसामने, कोण जिंकणार? सामना किती वाजता?

April 9, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) शुक्रवारी 2 चॅम्पियन संघ आमनेसामने असणार आहेत. पहिल्या मोसमातील चॅम्पियन टीम विरुद्ध गतविजेता यांच्यात ही लढत होणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात कडवी झुंज होणार आहे. राजस्थानचा हा चौथा तर आरसीबीचा हा तिसरा सामना असणार आहे. रियान पराग याच्याकडे राजस्थानच्या नेतृत्वाची सूत्रं आहेत. तर रजत पाटीदार आरसीबीचा कॅप्टन म्हणून जबाबदारी पाहणार आहे. उभयसंघातील सामना हा कधी आणि कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कधी?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना शुक्रवारी 10 एप्रिलला होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना हा गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मॅच मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

बंगळुरु राजस्थानवर वरचढ, पाहा आकडेवारी

दरम्यान राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 34 सामने खेळवण्यात आले आहेत. आरसीबीने या 34 पैकी राजस्थानच्या तुलनेत 3 सामने जास्त जिंकले आहेत. आरसीबीने 17 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर राजस्थानने आरसीबीचा 14 सामन्यांमध्ये धुव्वा उडवत विजय साकारला आहे. अशात आता या दोघांपैकी कोणता संघ आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यात यशस्वी ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर
  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in