
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पावसाने काय लावलंय? असा संतापजनक प्रश्न विचारण्याची वेळ क्रिकेट चाहत्यांवर आली आहे. पावसाने आधीच केकेआर विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना वाया घालवलाय. त्यानंतर पावसाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील 9 ओव्हर वाया घालवल्या. त्यामुळे उभभयसंघात फक्त 11 षटकांचाच सामना होऊ शकला. त्यानंतरही पावसाने आपला तडाखा कायम ठेवला आहे. स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. सामन्याला संध्याकाळी नियमांनुसार साडे सात वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाच्या विघ्नामुळे सामन्याचं वेळापत्रक कोळमडलं आहे.
Leave a Reply