• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs RCB: मुंबईनंतर आता आरसीबीचा नंबर, वैभव हिशोब करण्यासाठी सज्ज, गतविजेता रोखणार?

April 10, 2026 by admin Leave a Comment

 

वैभव सूर्यवंशी याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातून वयाच्या 14 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केलं. वैभवने पहिल्याच मोसमात वादळी शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.इतकंच नाही तर वैभव वेगवान शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. वैभवने हाच तडाखा 19 व्या मोसमातही कायम ठेवला आहे. राजस्थानने या 19 व्या मोसमात पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. वैभवने राजस्थानला विजयी करण्यात योगदान दिलं आहे. वैभवने पहिल्या 3 सामन्यांत फटकेबाजी करत चाहत्यांची मनं जिकंली.

राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादला पराभूत करुन विजयी सलामी दिली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन सलग दुसरा विजय मिळवला. तर मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत राजस्थानने विजयी हॅट्रिक पूर्ण केली. आता राजस्थानसमोर चौथ्या सामन्यात गतविजेता आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. वैभवने आरसीबी विरुद्ध जुना हिशोब बरोबर करण्याची संधी आहे.

राजस्थान 10 एप्रिलला शुक्रवारी 19 व्या मोसमातील 16 व्या आणि आपल्या मोहिमेतील चौथ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध 2 हात करणार आहे. राजस्थान आपल्या घरच्या मैदानात आरसीबी विरुद्ध विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. चाहत्यांचं या सामन्यानिमित्ताने वैभवसह यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली या तिघांच्या बॅटिंगकडे लक्ष असणार आहे.

वैभव आरसीबी विरुद्ध चमक दाखवणार?

वैभव गेल्या मोसमात मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात ढेर झाला होता. वैभवला पलटण विरुद्ध भोपळाही फोडता आला नाही. मात्र वैभवने गेल्या सामन्यात मंगळवारी मुंबई विरुद्ध 14 चेंडूत 39 धावा कुटल्या. वैभवने अशाप्रकारे मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. आता वैभव तोच तडाखा आरसीबी विरुद्ध कायम राखण्यात यशस्वी ठरणार का? याकडे लक्ष असणार आहे.

वैभवला गेल्या मोसमात आरसीबी विरुद्ध 24 एप्रिलला झालेल्या सामन्यात आश्वासक सुरुवात मिळाली होती. मात्र भुवनेश्वरने वैभवला 16 धावांवर बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे आता वैभवचा या सामन्यात मोठी खेळी करुन गेल्या सामन्यातील भरपाई करण्याचा प्रयत्न असणार आहे. वैभव या प्रयत्नात किती यशस्वी ठरतो हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

वैभवची 19 व्या मोसमातील कामगिरी

दरम्यान वैभव 19 व्या मोसमात आतापर्यंत राजस्थानसाठी तिन्ही सामने खेळला आहे. वैभवने या 3 सामन्यांत 1 अर्धशतक, 11 षटकार आणि 10 चौकारांसह एकूण 122 धावा केल्या आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं
  • HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in