• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

April 10, 2026 by admin Leave a Comment


कॅप्टन रजत पाटीदार याने केलेलं चाबूक अर्धशतक आणि अखेरच्या क्षणी वेंकटेश अय्यर याच्या इम्पॅक्ट खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात 200 पार मजल मारता आली. आरसीबीने गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्ससमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने राजस्थान रॉयल्स विरूद्ध 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 रन्स केल्या आहेत. राजस्थान आणि बंगळुरु दोन्ही संघांनी या मोसमात खेळलेले आपले सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता कोणत्या संघाच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लागणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

आरसीबीची अखेरच्या 17 चेंडूत निर्णायक फटकेबाजी

राजस्थानने आरसीबीला 18 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 166 रन्सवर आठवा झटका दिला. त्यामुळे आरसीबी 200 पार पोहचेल असा कुणी विचारही केला नसेल. मात्र त्यानंतरही आरसीबीने जोरदार कमबॅक केलं. आरसीबीला 200 पार पोहचवण्यात वेंकटेश आणि रोमरियो शेफर्ड या दोघांनी अखेरच्या टप्प्यात प्रमुख भूमिका बजावली. तसेच वेंकटेश याने भुवनेश्वर कुमार याच्यासह नवव्या विकेटसाठी 17 बॉलमध्ये नॉट आऊट 35 रन्सची पार्टनरशीप केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?
  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in