
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. हा सामना बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानात अर्थात गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये पाहुण्या मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आणि विजयाची हॅट्रिक केली. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना होता. मुंबईने 2 पैकी 1 सामना जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात मुंबईचा दिल्लीने पराभव केला होता. त्यामुळे मुंबईसमोर दिल्ली विरुद्ध कमबॅक करण्याचं आव्हान होतं. मात्र मुंबई राजस्थानसमोर अपयशी ठरली. पावसामुळे उभयसंघातील सामना 11 षटकांचा खेळवण्यात आला. राजस्थानने 3 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. मात्र विजयी धावांचा पाठलाग करताना मुंबईला 9 विकेट्स गमावून 123 धावांपर्यंतच पोहचता आलं. राजस्थानने अशाप्रकारे हा सामना जिंकला.
Leave a Reply