
राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपली विजयी घोडदौड कायम राखत धमाका केला आहे. राजस्थानने या मोसमातील 13 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे. राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात मुंबईचा 27 धावांनी धुव्वा उडवला आहे. राजस्थानने मुंबईसमोर 151 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 9 विकेट्स गमावून 123 धावांपर्यंतच पोहचता आलं. राजस्थानने अशाप्रकारे तिसरा विजय मिळवला. राजस्थानने यासह विजयी हॅट्रिक पूर्ण केली. तर मुंबईचा हा 3 सामन्यांमधील सलग दुसरा पराभव ठरला.
Leave a Reply