• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs CSK Live Streaming : राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान, कोण करणार विजयी सुरुवात? सामना किती वाजता?

March 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगणार आहे. 19 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात पहिल्या मोसमातील अंतिम फेरीतील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. हा सामना राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात होणार आहे. रियान पराग राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कधी?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना सोमवारी 30 मार्चला होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

राजस्थान-चेन्नईपैकी वरचढ कोण?

आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघ एकूण 31 वेळा आमनेसामने आले आहेत. एका विजयाचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबल आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयपीएल ट्रॉफीवर 5 वेळा नाव कोरणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला 31 पैकी 16 सामन्यांत पराभूत केलंय. तर राजस्थान रॉयल्सने 15 सामन्यात विजय मिळवला आहे.

धोनी 3 आठवडे आयपीएलला मुकणार!

दरम्यान सीएसकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून 2 नाही तर 3 आठवडे दूर रहावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा धोनी चाहत्यांसाठी मोठा झटका समजला जात आहे. धोनीला 3 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार या शक्यतेमुळे त्याला किमान 5-6 सामन्यांना मुकावं लागू शकतं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चाणाक्य म्हणतात, आयुष्यातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा नाश निश्चित
  • KKR vs LSG : लखनौच्या सनसनाटी विजयानंतर संजीव गोयंका यांनी मुकुल चौधरीसोबत भर मैदानात काय केलं? पाहा व्हीडिओ
  • घरात कापूर जाळताना विसरूनही करू नका या 5 चुका; होईल मोठे नुकसान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in