• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Sharma Angry Video : रोहित शर्माचं बायकोसोबत तुफान भांडण, रागात जाम भडकला; भर मैदानातच….व्हिडीओ व्हायरल!

March 9, 2026 by admin Leave a Comment


Rohit Sharma And Ritika Sajdeh Viral Video : भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारसताने न्यूझीलंडवर मात करून जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सध्या तुम्ही सोशल मीडियावर गेले तर सगळीकडे भारतीय क्रिकेट संघाच्या या दमदार कामगिरीचीच वाहवा होताना दिसत आहे. भारताने जेतेपद पटकावल्यानंतर मैदानावर खेळाडूंनी केलेल्या जल्लोषाचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानावर काय काय घडलं? हे सांगणारे हे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, भारतीय संघाच्या विजयानंतर जगभरात टीम इंडियाचे कौतुक केले जातेय. परंतु सध्या मात्र भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान मैदानावरील हा व्हिडीओ असून यात रोहित शर्मा आणि त्याची पत्नी दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून या पती-पत्नीमध्ये भांडण तर झाले नाही ना? असे विचारले जातेय.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. परंतु हाच व्हिडीओ पाहून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातायत. व्हिडीओमध्ये रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह एकमेकांच्या बाजूला उभे असल्याचे दिसत आहे. मैदानाच्या सीमेजवळ हे दोघेही एकमेकांशी बोलत आहेत. विशेष म्हणजे रोहित खूप नाराज दिसतोय. तर रितिकादेखील रोहितशी रागात काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे. रोहित तिच्या मताशी असहमत असल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून दोघांमध्ये भांडण झाल्याचा दावा केला जातोय. व्हिडीओच्या शेवटी रोहितची पत्नी स्मीतहास्य करतानाही दिसत आहे.

रोहित शर्मा बनने के बाद भी….

पतियों के यही हाल है…

तो हमें ज़िंदगी से कोई शिकायत नहीं है 😂😂 pic.twitter.com/gCjVhsSYsr

— kapil bishnoi (@Kapil_Jyani_) March 9, 2026

सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

दरम्यान, या दोघांमध्ये खरंच भांडण झाले का? हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही. परंतु सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून रोहितचे चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. दुसरीकडे रोहित शर्मा यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. यावेळच्या हंगामात रोहितकडून चांगल्या खेळाची अपेक्षा केली जात आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in