• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

April 13, 2026 by admin Leave a Comment


नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात याच्यावर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप असून, त्याचे महिलांसोबत केलेले आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर एसआयटीमार्फत तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप करत मोठा खुलासा केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात केवळ सामान्य नागरिक नव्हे तर काही राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी नाशिकमधील 35 हनी ट्रॅप प्रकरणांचाही उल्लेख करत, त्यावर कोणती कारवाई झाली, अधिकाऱ्यांवर दबाव होता का, असे प्रश्न उपस्थित केले. “सर्व संबंधितांची चौकशी झाली पाहिजे, कुणालाही वगळू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले की, “भाजप नेहमी आपल्या मित्र पक्षांना संपवण्यासाठी असे प्रकार करतो. नितीश कुमारचे काय झाले? साताऱ्यात काय चालले आहे?” त्यांनी पुढे सांगितले की, “आता जर चौकशी करायची असेल तर सगळ्यांची करा. सर्व नेत्यांची चौकशी व्हायला पाहिजे. इतर लोक का बाहेर येत नाही. एसआयटीचा चुकीचा वापर लोक करत असतील, काही लपवत असतील, काही नेते म्हणत आहेत की आमच्या लोकांचे व्हिडीओ पुढे येऊ देऊ नका.. एसआयटीचा वापर सिस्टीम क्लियर करण्यासाठी करा., अशी मागणी त्यांनी केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होर्मुझची नाकेबंदी होताच भारताला सर्वात मोठी खुशखबर; थेट तेहरानमधून… तेलाचं टेन्शनच मिटलं!
  • Palghar Love Jihad | पालघरमध्ये धक्कादायक प्रकार! मुस्लीम तरुणाकडून हिंदू नाव वापरुन 29 वर्षीय तरुणीची फसवणूक
  • हायवेवरील टॉयलेट खराब आहेत? गप्प बसू नका, तक्रार करा अन् 1000 रुपयांचे गिफ्ट मिळवा
  • फक्त 7 दिवसांत डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब होतील; फक्त करा हे काम
  • पाठीच्या कण्यात सतत होतायेत वेदना? ‘या’ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in